मुंबई : भारतीय शेअर बाजारात बुधवारी म्हणजेच 7 जानेवारीला काही मोठे आणि मिडकॅप स्टॉक्स चर्चेत राहू शकतात. विलीनीकरण अपडेट, मोठे प्रकल्प आणि लॉक-इन कालावधी संपल्यानं आणि संचालक मंडळ बैठक या मुळं काही शेअरमध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळू शकतात. काही स्टॉक्समध्ये शॉर्ट टर्म ट्रेडिंगचा पर्याय निर्माण होऊ शकतो.
बायोकॉन ची उपकंपनी अमेरिकेत होणाऱ्या एका आरोग्य परिषदेत तीन नव्या ऑन्कोलॉजी बायोसिलमिलर लाँच करण्याच्या तयारीत आहे. यामुळं कंपनीचा ऑन्कोलॉजी पोर्टफोलिओ मजबूत होईल आणि जागतिक बायोसिमिलर मार्केटमधील वाटा वाढवण्याचा धोरणात्मक भाग आहे.
टाटा कॅपिटलच्या शेअरमध्ये 7 जानेवारीला तीन महिन्यांचा शेअर होल्डर लॉक- इन कालावधी संपणार आहे. याद्वारे 7.12 कोटी शेअर ट्रेडिंगसाठी उपलब्ध होणार आहे. याची किंमत 2573 कोटी रुपये आहे. गेल्या दोन आठवड्यात स्टॉकमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली आहे.
मीशो (Meesho) चा एका महिन्याचा लॉक इन कालावधी संपणार आहे. नुवामा अल्टरनेटिव अँड क्वांटिटेटीव रिसर्चनुसार 10.99 कोटी शेअर म्हणजेच 2 टक्के इक्विटी ट्रेडिंगसाठी उपलब्ध होईल. याची किंमत 1973 कोटी आहे.
फिनो पेमेंटस बँकेनं सांगितलं की 8 जानेवारी ते 10 जानेवारीपर्यंत बँकिंग सेवा बंद राहणार असल्याचं सांगितलं. डाऊनटाईम कोर बँकिंग सिस्टीम आणि फिनॅकल प्लॅटफॉर्मवर मायग्रेट करण्यासाठी असेल.
इंडियन एनर्जी एक्सचेंजनं स्पष्ट केलं की सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनच्या मार्केट कपलिंग नियमानुसार आतापर्यंत अंतिम आदेश जारी करण्यात आलेला नाही. यानं स्पष्टीकरणामुळं या स्टॉकमध्ये 13 टक्के तेजी आलेली आहे.
ओएनजीसीनं सांगितलं की आंध्र प्रदेशातील मोरी-5 येथील गॅस लीक घटनेनंतर वरिष्ट व्यवस्थापनानं ऑपरेशनल कंट्रोल हाती घेतलं आहे. कंपनीच्या मते डायरेक्टर विक्रम सक्सेना क्रायसिस मॅनेजमेंट टीमसह घटनास्थळी कार्यरत आहे.
CEAT टायर कंपनीनं एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 19 जानेवारी 2026 ला होणार आहे. त्या बैठकीत डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले जातील.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
