Aishwarya Narkar : आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) या सध्या त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे बऱ्याच चर्चेत असतात. तसेच त्यांचे पती आणि अभिनेते अविनाश नारकर यांचे रिल्सही सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतं. या दोघांचे हे रिल्स सोशल मीडियावरही पसंतीस उतरतात. पण अनेकदा त्यांच्या या रिल्समुळे या जोडप्याला बरंच ट्रोल केलं जातं. नुकतच ऐश्वर्या नारकर यांच्या व्हिडिओवरही एकाने कमेंट केली.त्यावर ऐश्वर्या नारकर यांनीही खरमरीत उत्तर दिलं आहे.
अनेक मालिका,सिनेमे आणि नाटकांमधून ऐश्वर्या नारकर या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. त्यातच त्यांची आणि अविनाश नारकर यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन जोडीही तितकीच आवडते. त्यामुळे या जोडीने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. सध्या सोशल मीडियावरही याच जोडीची हवा आहे. पण सध्याच्या ऐश्वर्या नारकर यांच्या एका पोस्टची जोरदार चर्चा सुरु आहेत.
ऐश्वर्या नारकर यांची पोस्ट काय?
ऐश्वर्या नारकर यांच्या एका योगाच्या रिलवर एका नेटकऱ्याने आक्षेपार्ह कमेंट केली. त्याने म्हटलं की, जवानीमध्ये असे नखरे दाखवायला हवे होतेस. त्यावर ऐश्वर्या नारकर यांनीही खरमरीत उत्तर दिलं आहे. यावर ऐश्वर्या नारकर यांनी म्हटलं की, भाऊ कशाला स्वत:ची लायकी दाखवता. त्यांनी ही पोस्ट त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ठेवली आहे.
ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल
ऐश्वर्या नारकर या सध्या झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. त्यांची ही खलनायिकेची भूमिका प्रेक्षकांच्या देखील बरीच पसंतीस पडत आहे. तसेच ऐश्वर्या नारकर यांनी या सुखांनो या, लेक माझी लाडकी, स्वामिनी, श्रीमंताघरची सून यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये, तसेच यलो, धडक यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.