Aileen: Queen of the Serial Killers On Netfilx: सध्या ओटीटीच्या (OTT) दुनियेत अनेक नवनवे सिनेमे (Cinema) आणि वेब सीरिज (Web Series) येत असतात. अशीच एक नवी सीरिज ओटीटीवर (OTT Relesed) धुमाकूळ घालतेय. ही गोष्ट आहे एका, 'सिरियल किलर'ची. 'सिरियल किलर' (Serial Killer) हा शब्द ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यांसमोर एका पुरूषाची प्रतिमा समोर उभी राहते. पण तुम्हाला माहितीय का? जगातील सर्वात कुप्रसिद्ध महिला सीरियल किलर्सपैकी एक असलेल्या तिनं तिच्या आयुष्याची सुरुवात वेदना, शोषण आणि सूडाच्या अंधारात केलेली. तिथे मानवता हा शब्दही कुणाला ठाऊक नव्हता. ही कथा आहे, एलीन वुर्नोसची... जिला माध्यमांनी 'क्वीन ऑफ द सीरियल किलर्स' (Aileen: Queen of the Serial Killers) असं नाव दिलेलं. या 'सिरियल किलर'वर फक्त सिनेमाच हिट झाला नाही, तर अलिकडेच एक डॉक्युमेंट्रीही नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे.
एलीन वुर्नोसचा जन्म 1956 मध्ये मिशिगन (यूएसए) इथे झालेला. तिचं आयुष्य बालपणापासूनच संघर्षांनी भरलेलं होतं. तिचे वडील मानसिक आजारांनी ग्रस्त होते आणि कुख्यात गुंड होते. तिची आई तिला लहानपणीच सोडून गेलेली. 13 वर्षांची होईपर्यंत तिचं अनेकवेळा लैंगिक शोषण झालेलं. एलीननं स्वतःच खुलासा केलेला की, जवळजवळ 30 वेळा बलात्कार झाल्यानंतर तिचा मानवतेवरचा विश्वास उडाला होता.
एलीन वुर्नोसनं केलेली सात पुरूषांची हत्या (Aileen Wuornos Life Story)
फार लहान वयातच एलीन वुर्नोसन खूप अन्याय सहन केला. तिनं बाल वयातच रस्त्यावर उभं राहून देहविक्री करायला सुरुवात केली. याच दरम्यान, 1989 ते 1990 दरम्यान, तिनं फ्लोरिडा हायवेवर सात पुरुषांची हत्या केली. तिनं सांगितल्यानुसार, सर्वच पुरुष तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याची धमकी देत होते. ती म्हणाली, "मी स्वसंरक्षणार्थ त्यांना मारलंय, कारण ते माझ्यावर बलात्कार करणार होते..."
दरम्यान, तपास यंत्रणांनी या हत्या सिरियल किलिंग असल्याचं मानलं. एलीन वुर्नोसनला 1991 मध्ये अटक करण्यात आली आणि 2002 मध्ये तिला लेथल इंजेक्शन (प्राणघातक इंजेक्शन) देऊन मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
एलीन वुर्नोसच्या आयुष्यावर 'मॉन्स्टर' फिल्म (Monster Film On Life Of Aileen Wuornos)
एलीन वुर्नोसच्या कहाणीवर 2003 मध्ये 'मॉन्स्टर' फिल्म करण्यात आली. ज्यामध्ये चार्लीज थेरॉननं एलीन वुर्नोसची भूमिका साकारलेली आणि ऑस्कर जिंकलेला. एलीन वुर्नोसच्या आयुष्यावर नेटफ्लिक्सवर 'एलीन: क्वीन ऑफ द सीरियल किलर्स' नावाची डॉक्युमेंट्री आलीय. यामध्ये एलीन वुर्नोसचं आयुष्य आणखी जवळून जाणून घेण्याची संधी मिळेल. तिनं एवढा क्रूरतेचा कळस का गाठला? हे आणखी जवळून समजतं. एवढंच नाही तर, त्या डॉक्युमेंट्रीमध्ये वापरण्यात आलेलं खरं फुटेज ते आणखी मनोरंजक बनवतं.
पाहा ट्रेलर :
महत्त्वाच्या इतर बातम्या :