Bollywood Actress Works As Escort: प्रायव्हेट डिटेक्टिव (Private Ditective) तान्या पुरीनं (Tanya Puri) नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना बॉलिवूडच्या (Bollywood Superstar) एका सुपरस्टारच्या तरुण अभिनेत्रींसोबत असलेल्या लैंगिक संबंधांबाबत गौप्यस्फोट केलेला. तसेच, याबाबत त्याच्या पत्नीलाही ठाऊक असल्याचं सांगितलेलं. अशातच तिनं याच मुलाखतीत बोलताना बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगाआड लपलेल्या जगाचा आणखी एक सत्य सर्वांसमोर आणलं आहे. 

Continues below advertisement

प्रायव्हेट डिटेक्टिव असलेल्या तान्यानं नुकत्याच एका मुलाखतीत अनेक धक्कादायक दावे केलेले. एक बॉलिवूड अभिनेत्री वर्षानुवर्षे तिच्या जोडीदाराला फसवतेय, असा गंभीर आरोप तान्या पुरीनं केलेला. तसेच, ती एस्कॉर्ट म्हणून काम करते आणि पैसे कमविण्यासाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरते, असा खळबळजनक गौप्यस्फोटही तान्यानं केलेला. पण, तान्यानं त्या अभिनेत्रीचं नाव सांगितलं नाही. तान्या पुरीनं असाही दावा केला की, अभिनेत्री इंडस्ट्रीशी संबंध नसलेल्या पुरुषासोबत रिलेशनशिपमध्ये होती. सिद्धार्थ कन्नन याच्या मुलाखतीत तान्या पुरीनं अत्यंत खळबळजनक दावे केले.

"अभिनेत्रीला काम मिळत नव्हतं म्हणून तिनं..."

तान्या पुरीनं म्हटलेलं की, "ती एक अशी अभिनेत्री आहे, जी कित्येक वर्षांपासून इंडस्ट्रीत अॅक्टिव्ह आहे. आपल्या करिअरच्या वेळी तिला इंडस्ट्रीत फार काम मिळत नव्हतं. इंडस्ट्रीमध्ये तिची इमेज खूपच सोज्वळ, प्रतिष्ठित अभिनेत्री अशी आहे. ती कोणासोबत तरी रिलेशनशिपमध्ये आहे... पण हा सर्व दिखावा आहे..."

Continues below advertisement

"ती एस्कॉर्टसमोर काम करतेय, तिचे अनेक जणांसोबत संबंध"

तान्या पुरीनं पुढे बोलताना सांगितलं की, "ती अभिनेत्री एस्कॉर्ट म्हणून काम करते. ती लोकांना भेटते आणि तिच्यासाठी पैसे घेते. एक प्रकरण आहे, ज्यामध्ये एक मुलगा आमच्याकडे आला, तो त्याच अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये होता... त्यानं आम्हाला सांगितलं की, मला असं वाटतंय ती धोका देतेय. जेव्हा आम्ही तिची चौकशी सुरू केली, तेव्हा आम्हाला कळालं की, ती कित्येक लोकांसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्याचा पार्टनर इंडस्ट्रीतला नव्हता, आणि ती देशभर फिरायची आणि स्पेशन अपीरियन्स द्यायची, कारण तिला तसंच हायप्रोफाईल राहणीमान आवडायचं...  "

"अभिनेत्रीच्या पार्टनरला सत्य माहितीय, तरी नातं जपतोय..."

तान्या पुरीनं सांगितलं की, अभिनेत्रीच्या पार्टनरलाही सगळं काही ठाऊक आहे, पण तरीही त्यानं तिच्याशी संबंध तोडले नाहीत. ती म्हणाली, "काय चाललंय हे जाणूनही, अभिनेत्रीच्या पार्टनरला कधीही नातं संपवायचं नव्हतं. त्याला तिच्याशी बंद दारामागे बोलून तिला सामोरं जायचं होतं. त्यानं नातं संपवलं नाही, कारण त्याचाही स्वार्थ होता. अभिनेत्री तो चालवत असलेल्या बिझनेससाठी मदत करत होती. दोघेही एकत्र तो बिझनेस चालवत होते."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Bollywood Actor Extramarital Affair: दोन मुलांचा बाप, 20 वर्षांचा सुखी संसार; तरीसुद्धा बॉलिवूड दिग्गजाचे तरुण अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीसमोरच भांडाफोड