T20 World Cup 2026 Venue Update : वानखेडे स्टेडियमवर 2011 मध्ये टीम इंडियाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली वनडे विश्वचषक जिंकला होता. त्या ऐतिहासिक क्षणानंतर हे मैदान भारतीय क्रिकेटसाठी अभिमानाचं प्रतीक बनलं. पण आगामी टी-20 विश्वचषकात बीसीसीआयने मुंबईबाबत दुजाभाव केल्याची कुजुबज क्रीडाविश्वात रंगली आहे. कारण पुढील वर्षी फेब्रुवारी–मार्च महिन्यात होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या सामन्यांमध्ये वानखेडे स्टेडियमवर सेमी फायनल किंवा फायनल, असा कोणताही महत्त्वाचा सामना होणार नाही, अशी अपडेट समोर आली आहे. या स्पर्धेतील सेमीफायनल सामन्यांसाठी भारतातील दोन प्रमुख मैदानांची निवड करण्यात आली आहे. अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम आणि कोलकात्याचं ईडन गार्डन्स. पण वानखेडे स्टेडियमला मोठ्या सामन्यांसाठी संधी मिळालेली नाही.
बीसीसीआय आणि श्रीलंका क्रिकेट यांच्या संयुक्त यजमानत्वाखाली होणाऱ्या या विश्वचषकासाठी आयसीसीने आठ स्थळांना मंजुरी दिली आहे. भारताकडील पाच शहरांमध्ये मुंबई, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद आणि कोलकाता यांचा समावेश आहे, तर श्रीलंकेत कोलंबोतील दोन आणि कँडीतील एक स्टेडियमची निवड झाली आहे. मात्र, अंतिम सामना कुठे खेळला जाईल याचा निर्णय अजून घेण्यात आलेला नाही. हा निर्णय फायनलमध्ये कोणत्या संघांचा प्रवेश होतो यावर आणि विशेषतः पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचतो का यावर अवलंबून असेल.
पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचला तर भारतात नाही, तर श्रीलंकेत फायनल...
जर पाकिस्तान किंवा श्रीलंका उपांत्य फेरीपर्यंत पोहोचले, तर त्यांचे सामने कोलंबोमध्ये खेळवले जातील. पण जर हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत पोहोचले नाहीत, तर दोन्ही सेमीफायनल सामने भारतातच होतील. तसेच, पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचल्यास फायनल सामनाही श्रीलंकेत हलवला जाण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींवर आयसीसीने अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही.
20 संघांची रंगतदार स्पर्धा
17 ऑक्टोबर रोजी आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, हा विश्वचषक 20 संघांमध्ये खेळवला जाणार आहे. 2024 मध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये झालेल्या विश्वचषकाच्या प्रारूपातच ही स्पर्धा होईल. चार गटांमध्ये प्रत्येकी पाच संघ असतील. सर्व 13 कसोटी खेळणाऱ्या देशांसोबतच कॅनडा, नेदरलँड्स, यूएई, नेपाळ, ओमान आणि नामिबिया वगळता इतर सर्व पात्र संघ स्पर्धेत सहभागी होतील. युरोपियन संघ इटली या विश्वचषकात पहिल्यांदाच पदार्पण करणार आहे.
ग्रुप स्टेजनंतर सुपर एट फेरी
ग्रुप स्टेजनंतर ‘सुपर आठ’ फेरी खेळवली जाईल, ज्यात प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सहभागी होतील. त्यानंतर दोन गटांतील सर्वोच्च दोन-दोन संघ उपांत्य फेरी गाठतील. भारत सध्या टी-20 विश्वविजेता आहे, जून 2024 मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.
हे ही वाचा -
Ind vs Sa 1st Test : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पंत अन् ध्रुव जुरेल दोघांनाही संधी! ‘या’ खेळाडूचा पत्ता कट, टीम इंडियाच्या प्लेइंग-11 बाबत मोठी अपडेट