Actor Diagnosed With Skin Cancer: हॉलिवूड अभिनेता (Hollywood Actor) जेसन चेम्बर्सनं (Jason Chambers) सोशल मीडियावर (Social Media) एक पोस्ट शेअर करुन त्याच्या आजाराची माहिती दिली आहे.अभिनेत्यानं त्याच्या चाहत्यांना खास आवाहनही केलं आहे. अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून नेटकरी पुरते हादरले आहेत. इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "ज्यानं आपलं संपूर्ण आयुष्य उन्हात घालवलं आहे, लहानपणी खेळ खेळण्यापासून ते समुद्रात काम केलंय, मला वाटलं नव्हतं की,माझ्यावर सूर्यप्रकाशाचा हानिकारक परिणाम होऊ शकतो. 


अभिनेत्यानं पुढे लिहिलं आहे की, "मला सूर्य आवडतो आणि त्याच्या फायद्यांबद्दल देखील माहिती आहे, परंतु प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते, त्यात संतुलन राखणं खूप महत्वाचं आहे, म्हणून तुम्ही हुशारीनं काम करा आणि जीवनात सर्वकाही करा. याचाही धैर्यानं सामना करा.आता मला मेलेनोमा बायोप्सी उपचारासाठी मी अस्वस्थ होऊन वाट पहावी लागतेय. सुरुवातीला मला वाटलं की, हे त्वचेचे डाग आहेत, जे 6 महिन्यांत बदलले आहे, त्यामुळे ते लवकर ओळखणं चांगलं आहे. (बेफिकीर राहू नका आणि रोग लवकर ओळखा)” 


अभिनेत्याचं सर्वांना पोटतिडकीनं आवाहन 


अभिनेता चेम्बर्सनं आपल्या पोस्टच्या शेवटी चाहत्यांना आवाहन केलं आणि म्हटलं आहे की, "सावधगिरी बाळगा आणि केमिकल नसलेलं सनस्क्रीन प्रोडक्ट शोधा, डोक्यावर टोपी घाला. सावलीत राहा आणि सुरक्षितपणे सूर्याचा आनंद घ्या."


व्हिडीओमध्ये अभिनेता सांगत होता की, त्यानं कधीही सनस्क्रीन वापरलं नाही. आपल्या चुकांमधून शिकून सनस्क्रीनचा वापर करावा, असा इशारा त्यानं चाहत्यांना दिला. व्हिडीओमध्ये जेसन म्हणाला की, "माझ्या बायोप्सीचे निकाल आले आहेत आणि मला मेलेनोमा झाल्याचं आढळून आलं आहे. मी ऑस्ट्रेलियात आहे, पण बायोप्सी बालीमध्ये झाली. ऑस्ट्रेलियन डॉक्टर चांगले काम करत आहेत आणि पुढील निदानासाठी लिम्फ नोड्सची चाचणी करायची आहे."






दरम्यान, जेसन चेंबर्सनं ऑस्ट्रेलियन शो 'बिलो डेक डाऊन अंडर'सह इतर अनेक शोमध्ये उत्कृष्ट काम केलं आहे.


मेलेनोमा म्हणजे काय? 


मेलेनोमा, ज्याचा अर्थ 'काळा ट्यूमर' हा त्वचेचा कर्करोगाचा सर्वात धोकादायक प्रकार आहे. ते लवकर वाढते आणि कोणत्याही अवयवात पसरण्याची क्षमता असते. मेलेनोमा मेलेनोसाइट्स नावाच्या त्वचेच्या पेशींमधून येतो. या पेशी मेलेनिन तयार करतात, गडद रंगद्रव्य जे त्वचेला रंग देते. मेलेनोमा मेलेनोसाइट्स नावाच्या त्वचेच्या पेशींमधून येतो. या पेशी मेलेनिन तयार करतात, गडद रंगद्रव्य जे त्वचेला रंग देते. बहुतेक मेलेनोमा काळ्या किंवा तपकिरी रंगाचे असतात, परंतु काही गुलाबी, लाल, जांभळ्या किंवा त्वचेच्या रंगाचे असतात.


गेल्या वर्षी प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जेम्स मॅककॅफ्रे यांचं कर्करोगाने निधन झालं. दीर्घकाळ कर्करोगाशी लढा देणाऱ्या या अभिनेत्यानं वयाच्या 65 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. जेम्स मॅककॅफ्रेनं लोकप्रिय व्हिडीओ गेम फ्रँचायझीमध्ये 'मॅक्स पायनं' ला आवाज दिला आणि 'रेस्क्यु मी' यासह अनेक टीव्ही शोमध्ये काम केलेलं.