Saif Ali Khan Attack Case Updates : सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) घरात घुसण्याआधी हल्लेखोराकडून शाहरुख खान (Shah Rukh Khan), सलमान खानच्या (Salman Khan) घराची आरोपी महोम्मद शहजादनं (Mohammad Shahzad) रेकी केली असल्याची माहिती सूत्रांच्या वतीनं समोर आली आहे. सैफ अली खानचं घर चोरीसाठी सोयीचं वाटल्याचा दावा आरोपीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात केला आहे. सैफच्या मुलाला ओलीस ठेवून आरोपी पैशांची मागणी करणार होता. पण, ऐनवेळी घरातील सर्वजण जागे झाल्यामुळे डाव फिस्कटला, असंही आरोपीनं पोलिसांना सांगितलं आहे. 


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानच्या घरात घुसण्याआधी आरोपी मोहम्मद शहाजादनं अनेक सेलिब्रेटींच्या घराची रेकी केली होती. वांद्रे परिसरात वास्तव्यास असणाऱ्या अनेक सेलिब्रेटींच्या घराची आरोपीनं रेकी केली असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना दिलेल्या जबाबात आरोपीनं दिली आहे. अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि सैफ अली खानच्या घरासह अनेक घरांची आरोपीनं रेकी केलेली. एका रिक्षातून प्रवास करताना रिक्षाचालककडून या सेलिब्रेटिंच्या घराबद्दलची माहिती आरोपीनं मिळवली होती. 


धक्कादायक बाब म्हणजे, रेकी केल्यानंतर सहज घरात घुसण्यासाठी सैफचं घर सोयीचं वाटल्यानं आरोपीनं नेमकं तेच घर हेरलं आणि तिथे जाणाचा प्लान आखला. सैफचा चिमुकला जेहला ओलीस ठेवून पैसे उकळण्याचा आरोपीचा प्लान होता, असं आरोपीनं सांगितल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे. पण, हे करत असताना घरातले सगळेच जागे झाल्यानं आरोपी घाबरला आणि सुटकेसाठी बिथरलेल्या आरोपीनं अंधाधुंद वार करण्यास सुरुवात केली. याचवेळी सैफ अली खानवर एकूण 6 वार आरोपीनं केले आणि घाबरून तिथून फरार झाला. आरोपीला बांगलादेशात पुन्हा जाण्यासाठी बनावट पासपोर्ट हवा होता त्यासाठीच पैश्यांची व्यवस्था आरोपी करत होता अशीही माहितीही समोर आली आहे. पोलिसांकडून सुरू असलेल्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. 


यापूर्वीही आरोपीकडून चोरीचा प्रयत्न 


सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोर यापूर्वी वरळीतील कॅफेत कामाला होता. त्यानं त्यावेळी तिथेही चोरी केल्याची बाब समोर आली आहे. एका ग्राहकाची अंगठी चोरण्याच्या प्रकरणात सहभागी असल्यावरुन त्याला कामावरुन काढण्यात आलं होतं. वरळीतील कॅफेत एका ग्राहकाची अंगठी चोरी प्रकरणात त्याचाही सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्याला गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये कामावरून कमी करण्यात आलं होतं. दरम्यान, पोलिसांनी रविवारी वरळीत शरीफुल उर्फ दास काम करत असलेल्या ठिकाणच्या जुन्या कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. कर्मचाऱ्यांच्या चौकशीतून आरोपी आधीही चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. 


पाहा व्हिडीओ : Mohmmad Shahjad Reki Celebrity Home : सैफच्या हल्लेखोराकडून अनेक सेलिब्रेटींच्या घरांची रेकी



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Saif Ali Khan Attack Case: सैफला भोसकणाऱ्याच्या हाताला चोरीचा चळ; कामाच्या ठिकाणी ग्राहकाची अंगठी केलेली लंपास, कामावरुन झालेली हकालपट्टी