Advocate Urja Shinde Prepares for Her First Challenging Case: स्टार प्रवाहवरील अनेक मालिका आवर्जून पाहिले जातात. त्यातील एका गाजणारी मालिका म्हणजे 'वचन दिले तू मला'.  ही मालिका अल्पावधीतच घराघरात पोहोचली. या मालिकेचा  मोठा चाहतावर्ग आहे.  ही मालिका सध्या एका रंजक वळणावर आहे. मुख्य पात्र अ‍ॅडव्होकेट ऊर्जा शिंदे आता तिच्या आयुष्यातील पहिली आणि अत्यंत आव्हानात्मक केस लढण्यासाठी सज्ज झालीये. न्यायाच्या या संघर्षाला सुरुवात करण्यापूर्वी ऊर्जाने खऱ्या आयुष्यातील दिग्गज आणि ख्यातनाम सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची भेट घेतली. अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची भेट घेऊन तसेच आशीर्वादाने आपल्या न्यायप्रवासाची सुरुवात केली. सध्या अभिनेत्री अनुष्का सरकटे (ऊर्जा शिंदे) हिचा अॅड. निकम यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Continues below advertisement

'वचन दिले तू मला' या मालिकेत आपल्या कोर्टरूम ड्रामा पाहायला मिळेल. या मालिकेची मुख्य नायिका अॅड. ऊर्जा शिंदे ही भूमिका अभिनेत्री अनुष्का सरकटे साकारत आहे. ही मालिका 15 डिसेंबर 2025पासून प्रेक्षकांच्या भेटीस आली असून, या मालिकेतून रोज नवीन ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळतात.  या मालिकेत लवकरच ऊर्जा शिंदे हे पात्र केस लढताना दिसणार आहे. यासाठी तिने आधी खऱ्या आयुष्यातील ख्यातनाम सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची भेट घेतली. तसेच त्यांच्याकडून मार्गदर्शनही घेतले.

 'उज्ज्वल निकम यांना भेटून मनापासून आनंद झाला'

या भेटीबद्दल सांगताना ऊर्जाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का सरकटे म्हणाली की, 'उज्ज्वल निकम सरांना भेटून मनापासून खूप आनंद झाला. त्यांनी दिलेला वेळ, प्रेमळ शब्द आणि आशीर्वाद माझ्यासाठी फार मोलाचे आहेत. हा क्षण मी कायम लक्षात ठेवेन.' अशी भावना अनुष्काने या भेटीनंतर व्यक्त केली. सध्या दोघांचा फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या संपूर्ण प्रवासातील  विशेष बाब म्हणजे, ऊर्जा न्यायालयात निष्णात वकील हर्षवर्धन जहागिरदार यांच्या विरोधात उभी राहणार  असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल.

Continues below advertisement

दरम्यान,  ऊर्जाची ही पहिली केस केवळ एक खटला नसून,  न्यायासाठीचा निर्णायक संघर्ष ठरणार आहे. आता या संघर्षात ऊर्जा स्वत:ला कसं सिद्ध करणार? हे पाहणे  महत्त्वाचं ठरेल. यासाठी आपल्याला  स्टार प्रवाहवर दररोज रात्री 9:30 वाजता  'वचन दिले तू मला' ही मालिका पाहावी लागेल.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

लग्न, दुरावा, गर्भपात अन् घटस्फोट…नैराश्याच्या गर्तेत अडकली होती 'ही' अभिनेत्री, स्वत:ला कसं सावरलं?