BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) पार्श्वभूमीवर आरोप–प्रत्यारोप आणि हिंसक घटनांची मालिका सुरूच असून, नवी मुंबईतील राड्यानंतर आता मुंबईतील प्रभाग क्रमांक 124 मध्ये मध्यरात्री मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत शिवसेना ठाकरे गटाचे दोन कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Continues below advertisement

प्रभाग क्रमांक 124 मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उमेदवार सकीना शेख यांच्या कार्यकर्त्यांवर शिवसेना (शिंदे गट) उमेदवार हारून खान यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

BMC Election 2026: पैसे वाटप पकडल्याने वादाला फुटले तोंड

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शिंदे गटाचे कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटप करत असताना पकडले गेले. यानंतर दोन्ही गटांमध्ये वाद झाला आणि पाहता पाहता हा वाद मारहाणीपर्यंत गेला. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. या मारहाणीत ठाकरे गटाचे दोन कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Continues below advertisement

Navi Mumbai Election 2026: नवी मुंबईतही राडा

दरम्यान, सोमवारी नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात भाजपचे कार्यकर्ते शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण करताना स्पष्टपणे दिसत आहेत. नवी मुंबईतील घटनेत शिंदे गटाचा एक कार्यकर्ता मतदारांना पैसे वाटत असल्याच्या आरोपाखाली भाजप कार्यकर्त्यांच्या तावडीत सापडला होता. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केली, गळा आवळला, फोन हिसकावून घेतल्याचे व्हिडीओत दिसून आले होते. यानंतर मुंबईमध्ये दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळाले.

BMC Election 2026: आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात पैसे वाटपाचे आरोप

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात देखील पैसे वाटपाचे गंभीर आरोप झाले आहेत. प्रभाग क्रमांक 193 मधील ठाकरे गटाच्या उमेदवार हेमांगी वरळीकर यांच्या पती हरिश वरळीकर यांनी बैठकीच्या नावाखाली महिलांना बोलावून पैसे वाटल्याचा आरोप अपक्ष उमेदवार आणि शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. या पैसे वाटपाचे व्हिडिओ समोर आले असून ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे हे व्हिडिओ ठाकरे गटाचे माजी शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी यांनीच समोर आणले आहेत. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले सूर्यकांत कोळी सध्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Nashik Municipal Election 2026: नाशिकमध्ये निवडणुकीला गालबोट, 'आप'च्या उमेदवारावर रोखली थेट बंदूक, जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप