Aditya Dhar Working On Dhurandhar 3: सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) रिलीज झालेल्या सिनेमांपेक्षाही रिलीज न झालेल्या 'धुरंधर 2'ची (Dhurandhar 2) चर्चा आहे. आदित्य धरचा (Aditya Dhar) 'धुरंधर 2' काहीच दिवसांत रिलीज होणार आहे. 'धुरंधर'पासूनच त्याचा पुढचा सिनेमा 'धुरंधर 2'ची प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा रंगलेली. आता सिनेमानं रिलीजपूर्वीच मोठे रेकॉर्ड मोडले आहेत. अधिकृत रिलीजपूर्वीच या सिनेमाबाबतचे अनेक महत्त्वाचे अपडेट्स समोर येऊ लागले आहेत.
ज्यावेळी 'धुरंधर' सिनेमा रिलीज झाला, त्याचवेळी 'धुरंधर 2'बाबत अपडेट्स देण्यात आलेले. अशातच आता 'धुरंधर 2' रिलीज होणार आहे, त्यापूर्वीच आता 'धुरंधर 3' बाबतची मोठी अपडेट समोर आली आहे. 'धुरंधर 2' 19 मार्च रोजी थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे. अशातच, आता पुढे काय? 'धुरंधर 3' बनवला जाणार की, नाही? अशा चर्चा रंगलेल्या. यावर आता मोठी अपडेट समोर आली आहे. 'धुरंधर 2' नंतर 'धुरंधर 3'साठी मेकर्सनी सर्वात मोठी रणनिती आखल्याचं समोर आलं आहे.
'धुरंधर 3'बाबतची सर्वात मोठी अपडेट (Biggest Update Regarding Dhurandhar 3)
व्हरायटी इंडियाच्या एका अहवालानुसार, 'धुरंधर: द रिवेंज' या सिनेमाला प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रचंड प्रतिसाद मिळतोय. परिणामी, या सिनेमाचं विश्व (Cinematic Universe) आणखी विस्तारण्यास निर्माते उत्सुक आहेत. जर या रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाल्यास, स्टुडिओ आदित्य धर यांना 'धुरंधर 3' वरही काम सुरू करण्यासाठी आग्रह करत आहे.
या रिपोर्टमध्ये पुढे असंही नमूद केलं आहे की, हा विषय अनेक भागांमध्ये (Installments) विकसित करण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. याच कारणामुळे, तिसरा भाग येण्याची शक्यता किंचितही नाकारता येत नाही. या रिपोर्टमधून असंही समोर आलं आहे की, आदित्य यांच्याकडे तिसऱ्या पार्टसाठीया कल्पना आधीच तयार आहेत.
दरम्यान, त्यांनी या प्रकल्पाबाबत अद्याप कोणतंही ठोस आश्वासन दिलेलं नाही. दुसरीकडे, स्टुडिओ मात्र ही संधी हातातून निसटू न देण्याबाबत ठाम आहे. परिणामी, प्रेक्षकांचा उत्साह कायम राखण्याच्या उद्देशानं, त्यांनी निर्मात्यांना चित्रपटाच्या शेवटी (Post Credits) किमान एक 'टीझर' समाविष्ट करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून चाहत्यांना तिसरा भाग येण्याच्या शक्यतेबाबत एक संकेत मिळेल.
आदित्य धरबाबत बोलायचं झाल्यास, या दिग्दर्शकाला फिल्म्सच्या फ्रेंचायझीवर काम करायला फारसं आवडत नाही. त्याला फ्रेंचायझी बनवणं अजिबातच आवडत नाही. त्याऐवजी या दिग्दर्शकाला नव्या प्रोजेक्ट्सवर काम करायला फार आवडतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
