OTT Spy Thriller: धुरंधर या स्पाय थ्रिलर चित्रपटाची जादू आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. (Dhurandhar) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर धुरंदरचा सिक्वेलही प्रदर्शनाच्या दारात उभा आहे. धुरंधर 2 या स्पाय थ्रिलर चित्रपटाविषयी प्रचंड क्रेझ दिसून येत आहे. या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 20 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. मुंबई दिल्लीतील चित्रपटगृह हाउसफुल झाली आहेत. स्पाय थ्रिलरच्या श्रेणीतील या चित्रपटाने प्रेक्षकांवर जबरदस्त छाप पाडली. दिग्दर्शक आदित्य धर यांनी हा चित्रपट ज्या भव्य पद्धतीने सादर केला, त्यामुळे तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या चित्रपटाने जगभरात तब्बल 1300 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती.मात्र याहूनही जास्त कमाई करणारा एक स्पाय थ्रिलर चित्रपट आहे, जो आजही OTT वर मस्ट वॉच मानला जातो. 

खऱ्या कहाणीवर आधारित स्पाय थ्रिलर

आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत तो म्हणजे ब्रिज ऑफ स्पाइस. 2015 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक  स्टीवन स्पीलबर्ग यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची कथा कोल्ड वॉरच्या काळातील एका खऱ्या घटनेवर आधारित आहे. चित्रपटाची कथा जेम्स डोनोवन या वकिलाभोवती फिरते. तो एका सोव्हिएत गुप्तहेराचा केस लढतो. मात्र त्याचा हा निर्णय पुढे एका धोकादायक मिशनमध्ये बदलतो. दोन गुप्तहेरांची अदलाबदल करण्याच्या या मिशनमध्ये प्रचंड सस्पेन्स आणि थ्रिल पाहायला मिळतो.

बॉक्स ऑफिसवरही सुपरहिट

ऑस्कर पुरस्कार मिळालेल्या या चित्रपटात  टॉम हँक्स,  मार्क रायलेन्स, एमी रायन आणि एलन एल्डा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट 2015 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला. सुमारे 40 मिलियन डॉलर (साधारण 370 कोटी रुपये) खर्चात तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 165 मिलियन डॉलर (साधारण 1500 कोटी रुपये) कमावले.

OTT वर कुठे पाहता येईल?

2 तास 22 मिनिटे कालावधी असलेला हा स्पाय थ्रिलर चित्रपट आजही OTT वर उपलब्ध आहे. 7.6 IMDb रेटिंग असलेला हा चित्रपट तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकता. जर तुम्ही  धुरंधर 2 पाहण्याआधी एखादा दमदार स्पाय थ्रिलर पाहण्याचा विचार करत असाल, तर हा चित्रपट नक्कीच तुमच्या वॉचलिस्टमध्ये असायला हवा.