मुंबई : बॉलिवुडमध्ये तुम्हाला रोज नवनवे चेहरे दिसतात. या बॉलिवुडमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक तरुण-तरुणी मुंबईची वाट धरतात. यामध्येच प्रसिद्ध अभिनेत्री सना खान हिचादेखील समावेश होते. या अभिनेत्रीने आपला काळ चांगलाच गाजवला होता. लग्न झाल्यानंतर मात्र या अभिनेत्रीने बॉलिवुडला रामराम ठोकत आनंदात वैवाहिक जीवन घालवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, याच सना खानच्या घरी एक खुशखबर आली आहे. या अभिनेत्रीच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला असून तिने गोड मुलाला जन्म दिला आहे. 


सना खानने दिला दुसऱ्या मुलाला जन्म


खुद्द सना खाननेच ही खुशखबर दिली आहे. आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर तिने याबाबत माहिती दिली आहे. तिने एक व्हिडीओ पोस्ट करून आमच्या घरी छोटा पाहुणा आल्याचं म्हटलं. विशेष म्हणजे सना खानने त्यांना मुलगा झाल्याचं सांगितलंय. ही खुशखबर देताना तिने आपला पती अनस सय्यदलाही टॅग केलं आहे. सना खान आणि अनस सय्यद दुसऱ्यांना आई-बाबा झाले आहेत. सोमवारी (6 जानेवारी) त्यांनी याबाबतची माहिती सार्वजनिक केली आहे. सनाला याआधीही मुलगाच झाला होता. आता ती दोन मुलांची आई झाली आहे. 


2020 मध्ये केलं लग्न


सनाने ही खुशखबर देताना समर्पक असे कॅप्शन दिले आहे. अल्लाहने प्रत्येकाच्या आयुष्यात सर्व गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. वेळ आल्यावर अल्लाह आपल्याला त्या गोष्टी देतो. विशेष म्हणजे अल्लाह नशिबात असलेल्या गोष्टी जेव्हा देतो तेव्हा आपली झोळी आनंदाने तो भरून टाकतो, असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय. तर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये आपल्या मुलाला तिने छोटा राजकुमार असं म्हटलंय. सना खान आणि अनस सय्यद यांनी 21 नोव्हेंबर 2020 मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर 5 जुलै 2023 मध्ये तिने आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला. त्यांनी आपल्या या मुलाचे नाव तारीक जामील असे ठेवले. 






लग्नाआधी बॉलिवुडला अलविदा 


पहिल्या मुलाच्या जन्मानंतर लगेच नऊ महिन्यांनी सना खानने दुसऱ्यांदा गर्भवती असल्याचे जाहीर केले होते. इन्स्टाग्रावर व्हिडीओ पोस्ट करून तिने अल्लाहचे आभार मानले होते. दरम्यान, सना खान ही बीग बॉस सिझन 6 मध्ये झळकली होती. तेव्हापासून ती देशभरात प्रसिद्ध झाली होती. पुढे तिने सलमान खानच्या जय हो या चित्रपटातही काम केले होते. मात्र लग्नाच्या आधी तिने बॉलिवुडला रामराम ठोकला आणि नोव्हेंबर 2020 मध्ये लग्न केले.


हेही वाचा : 


एक खून...अनेक आरोपी..! स्वप्नील जोशीच्या 'जिलबी' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च, मर्डरमिस्ट्री पाहून तुम्हीही व्हाल थक्क  


गेल्या 30 वर्षांत कुणालाच जमलं नाही ते पुष्पा-2 ने करून दाखवलं, अल्लू अर्जुनच्या चित्रपटाची कमाई वाचून थक्क व्हाल!