गेल्या 30 वर्षांत कुणालाच जमलं नाही ते पुष्पा-2 ने करून दाखवलं, अल्लू अर्जुनच्या चित्रपटाची कमाई वाचून थक्क व्हाल!
Pushpa 2 Box Office Collection Day 33 : गेल्या बऱ्याच दिवसांपासून दाक्षिणात्त्य सुपरसटार अल्लू अर्जुनचा पु्ष्पा-2 हा चित्रपट चर्चेत आहे. एक महिना उलटून गेला तरी हा चित्रपट अजूनही चित्रपटगृहांत चालू आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा चित्रपट पाहण्यासाठी रोज अनेक सिनेरसिक चित्रपटगृहांत गर्दी करतात. दरम्यान, चित्रपट प्रदर्शनाच्या 33 व्या दिवशी या चित्रपटाने मोठा विक्रम केला आहे. गेल्या 30 वर्षांत कोणालाच जमलं नाही, ते पु्ष्पा-2 ने करून दाखवलं आहे.
पु्ष्पा-2 हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून हा चित्रपट गेल्या 33 दिवसांपासून चित्रपटगृहांमध्ये चालू आहे. दरम्यानच्या काळात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. या चित्रपटाला आज 33 दिवस झाले आहेत.
पुष्पा 2 चित्रपटाच्या निर्मात्यांनी आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर एक पोस्ट शेअर केल आहे. यात निर्मात्यांनी आतापर्यंत किती रुपयांची कमाई केलेली आहे, याची माहिती दिली आहे.
या माहितीनुसार पुष्पा-2 या चित्रपटाने जगभरात एकूण 1831 कोटी रुपयांची कमाई केली आहे. बाहुबली या चित्रपटाने याआधी जगभरात 1788.06 कोटी रुपयांची कमाई केलेली आहे.
पुष्पा- 2 या चित्रपटाने बाहुबली या चित्रपटाला कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. त्यानंतर आता हा चित्रपट दंगल या चित्रपटाचा विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे.
पुष्पा 2 या चित्रपटाने आणखी एक विक्रम मोडला आहे. हा चित्रपट गेल्या 30 वर्षांत सर्वाधिक पाहिलेला तिसऱ्या क्रमांचा चित्रपट ठरला आहे.
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना