अभिनेत्री रेखाचा बंगला बीएमसीकडून सील, बंगल्यावरील सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री रेखा (actress rekha) यांचा बंगला बीएमसीने सील केला आहे. रेखा यांच्या बंगल्यावरील सिक्युरिटी गार्ड कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे.

Continues below advertisement
मुंबई : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचा बंगला बीएमसीने सील केला आहे. रेखा यांच्या बंगल्यावरील सिक्युरिटी गार्ड कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. यानंतर बीएमसीने रेखा यांचा बंगला सील केला. बंगल्याच्या बाहेर नोटीस लावून बंगल्याला कोरोना कन्टेन्मेन्ट झोन घोषित केलं आहे. वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात रेखा यांचा 'सी स्प्रिंग' हा बंगला आहे. या बंगल्यात दोन सुरक्षारक्षक असतात. त्यापैकी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. संबंधित सुरक्षारक्षकावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण परिसराला सॅनिटाइज केले आहे. याप्रकरणी रेखा किंवा त्यांच्या प्रवक्त्याकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली नाही. रेखा यांच्या घराबाहेर नेहमी दोन सुरक्षारक्षक असतात. यातील एक सुरक्षारक्षक कोरोनाग्रस्त झाला आहे. सध्या त्याच्यावर बीकेसीतील एका दवाखान्यात उपचार सुरू आहेत. कोरोनाचा फटका याआधीही बॉलिवूडला बसलाय. गेल्या महिन्यातच आमिर खानच्या घरातील सात कर्मचारी करोना पॉझिटिव्ह निघाले होते. यात आमिरचे दोन अंगरक्षक आणि एक स्वयंपाक करणारा कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह आला होता. यानंतर आमिरच्या संपूर्ण कुटुंबाची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यात त्याच्या घरातील सदस्य निगेटिव्ह आले होते. त्याआधी जान्हवी कपूर आणि करण जोहरच्या स्टाफलाही कोरोनाची लागण झाली होती. बिग बी अमिताभ आणि अभिषेक यांना कोरोना बिग बी अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना कोरोना झाल्याचं काल रात्री समोर आलं आहे. या दोघांव्यतिरिक्त बच्चन कुटुंबातील बाकी सदस्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अमिताभ आणि अभिषेक यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक-ऐश्वर्या यांची आठ वर्षांची मुलगी आराध्या बच्चन हिची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. सध्या दोघांवर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. संबंधित बातम्या लॉकडाऊन काळात बिग बी अमिताभ यांचं घरुन शूट, KBC सह काही जाहिरातींचं चित्रिकरण Bachchan family | अमिताभ, अभिषेक यांच्या व्यतिरिक्त बच्चन कुटुंबातील सदस्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह Abhishek Bachchan | अमिताभ बच्चन यांच्यानंतर मुलगा अभिषेक बच्चन याचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola