Actress Rajeshwari Kharat : अभिनेत्री राजेश्वरी खरात (Actress Rajeshwari Kharat) पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यावेळी तिने प्रसिद्ध पंजाबी गायक गुरु रंधावा यांच्या ‘Suit Suit’ या लोकप्रिय गाण्यावर थिरकत एक खास व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. राजेश्वरी खरातचा (Actress Rajeshwari Kharat) हा व्हिडीओ सध्या चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे आणि तुफान व्हायरल होत आहे.
राजेश्वरीने (Actress Rajeshwari Kharat) या व्हिडीओमध्ये तिचा वेस्टर्न आणि पारंपरिक लूकसह स्टायलिश डान्स मूव्हज केल्या आहेत. तिचा हा डान्स सोशल मीडियावर विशेष आकर्षण ठरत आहेत. चेहऱ्यावर हलक्याशा हास्यासह तिने या गाण्यावर सुंदर नृत्य सादर केलं असून तिची अदा आणि आत्मविश्वास प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालत आहे. ‘Suit Suit’ हे गाणं आधीच लोकप्रिय असून राजेश्वरीच्या खरातने केलेला डान्स इन्स्टाग्रामवर व्हायरल झालाय. तिच्या या व्हिडीओवर लाईक आणि कमेट्सचा पाऊस पडतोय. राजेश्वरीने हा व्हिडीओ पोस्ट करताच तिच्या फॉलोअर्सकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे. काहींनी तिच्या डान्सची प्रशंसा केली, तर काहींनी तिचा अंदाज अत्यंत गोड असल्याचं म्हटलं. चाहत्यांना तिच्या आगामी प्रोजेक्ट्सची उत्सुकता आहे.
राजेश्वरी खरात ही एक मराठी अभिनेत्री असून, तिने नागराज मंजुळे दिग्दर्शित फँड्री (2013) या चित्रपटातील 'शालू' या भूमिकेमुळे विशेष ओळख मिळवली. तिने आपल्या अभिनयाची सुरुवात फँड्री चित्रपटातून केली, ज्यामध्ये तिने एका उच्चवर्णीय मुलीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट जातीभेदावर आधारित असून, एका तरुणाची प्रेमकथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक सन्मान मिळवले. राजेश्वरीचा जन्म 8 एप्रिल 1998 रोजी पुण्यात झाला. तिने आपले शालेय शिक्षण पुण्यातील 'जोग एज्युकेशन ट्रस्ट स्कूल'मध्ये पूर्ण केले आणि पुढे सिंहगड महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या