Malavika Mohanan Assault: फिल्म इंडस्ट्रीचं (Film Industry) विश्व ग्लॅमरस दिसतं, इथला चकचकीतपणा प्रत्येकालाच भूरळ घालतो. इथे आपलं नशीब आजमवायला दररोज म्हटलं तरी, अनेक तरुण-तरुणी येत असतात. यापैकी काहींचं नशीब पालटतं, तर काहीजण खचता खात प्रयत्न करत राहतात. यापैकीच एक अभिनेत्री मालविका मोहनन (Malavika Mohanan). मालविकानं अलिकडेच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत बोलताना तिनं तिच्यासोबत घडलेला एक भयंकर प्रसंग सांगितला. त्यामुळे सर्वांच्या पायाखालची जमीन हादरली आहे. दरम्यान, अभिनेत्रीनं सांगितलेला किस्सा ज्यावेळी ती कॉलेजला जात होती, तेव्हाचा आहे. ज्याचा साधा विचारही आजही तिच्या काळजाचा ठोका चुकवतो.
"मुंबई महिलांसाठी सुरक्षित नाही..."
प्रसिद्ध अभिनेत्री मालविका मोहनननं मुलाखतीत बोलताना सांगितलं की, जेव्हा ती मुंबईतील तिच्या कॉलेजला लोकल ट्रेननं प्रवास करायची. तिला आठवलं की, एका अनोळखी व्यक्तीनं तिला थेट किस घेण्यासाठी विचारणा केली होती. हा किस्सा सांगताना अभिनेत्रीनं मुंबई शहर अनेक महिलांसाठी कसं असुरक्षित आहे, हेदेखील अगदी निक्षून सांगितलं.
"माझ्याकडे गाडी, ड्रायव्हर आहे म्हणून मी सुरक्षित..."
हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मालविका म्हणाली की, आज तिला मुंबई किंवा इतर कोणत्याही शहरात सुरक्षित वाटतंय, कारण तिच्याकडे स्वतःची कार आणि ड्रायव्हर आहे, पण प्रत्येक महिलेच्या बाबतीत असं नसतं. ती पुढे म्हणाली की, "लोक अनेकदा म्हणतात की, मुंबई महिलांसाठी सुरक्षित आहे, पण हे खरं नाही. आज माझ्याकडे स्वतःची गाडी आणि ड्रायव्हर आहे. म्हणून जर कोणी मला विचारलं की, मुंबई सुरक्षित आहे का? तर मी हो म्हणेन."
"एक चुम्मा देगी क्या...? 'तो' कानात म्हणाला..."
त्यानंतर तिला तिच्या कॉलेजच्या काळातील एक भयानक घटना आठवली. ती म्हणाली, "मला आठवतंय एकदा मी आणि माझे दोन जवळच्या मैत्रिणी लोकल ट्रेननं प्रवास करत होतो आणि मला वाटतं रात्रीचे 9.30 वाजले होते आणि आम्ही फर्स्ट क्लासमध्ये होतो. तर, डबा बराच रिकामा होता. प्रत्यक्षात आमच्या तिघींशिवाय दुसरं कोणीही नव्हतं. आम्ही खिडकीच्या ग्रिलजवळ बसलो होतो. आणि एक माणूस ग्रिलच्या अगदी जवळ आला, ग्रिलवर त्याचा चेहरा चिकटवला आणि म्हणाला, 'एक चुम्मा देगी क्या...?"
तो पुढे म्हणाला की, "आम्हाला तिघांनाही धक्का बसला. त्या वयात, अशा परिस्थितीत, कशी प्रतिक्रिया द्यायची? हे आम्हाला समजलंच नाही? जर त्यानं ट्रेनमध्ये उडी मारली तर?" अशा पब्लिक प्लेसेसवरुन प्रवास करणाऱ्या प्रत्येक महिलेकडे छळ आणि छेडछाडीच्या अशा असंख्य कहाण्या असतील..."
दरम्यान, मालविका मोहननच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, मालविका प्रभाससोबत डेब्यु करणार आहे. आगामी तेलगु चित्रपट 'द राजा साब'मधून मालविका पदार्पण करणार आहे. हॉरर-कॉमेडी असलेला हा चित्रपट 10 एप्रिलला रिलीज केला जाणार होता. पण, काही कारणास्तव याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. रिलीजच्या नव्या तारखेबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :