मुंबई : 90 च्या दशकात लाखो तरूणांच्या मनावर राज्य करणारी प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी तब्बल 24 वर्षांनी भारतात परतली. भारतात परतल्यानंतर मला फार आनंद झाला आहे, असं या अभिनेत्रीने म्हटलंय. भारतात येताच ममता कुलकर्णीने इन्स्टाग्रामवर एक सेल्फी व्हिडीओ शेअर केला आहे. काही वर्षांपूर्वी याच अभिनेत्रीचे नाव 2000 कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात आले होते. त्यानंतर तिच्या करिअरला उतरती कळा लागली होती.
ममता कुलकर्णी भारतात परतल्यावर काय म्हणाली?
भारतात परतताच ममता कुलकर्णीने इन्स्टाग्रावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. "हाय मित्रांनो. मी ममता कुलकर्णी. मी तब्बल 25 वर्षांनी भारत, मॉम्बे, मुंबई, आमची मुंबईमध्ये आली आहे. मी फारच खूश आहे. या आनंदाला मी कशी व्यक्त करू हेच मला समजत नाहीये. मी फारच भावूक आहे. 24 वर्षांनी मी माझ्या देशाला फ्लाईटमधून पाहिलं आणि मी फारच भावूक झाले. माझ्या डोळ्यांत अश्रू होते. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर पाऊल ठेवताच मी फारच भावूक झाले," असं ममताने आपल्या या व्हिडीओत म्हटलंय.
2002 साली प्रसिद्ध झाला शेवटचा चित्रपट
दरम्यान, ममता कुलकर्णी भारतात नेमकं का परतली, याबाबत तिनं कोणतीही माहिती दिलेली नाही. ममता कुलकर्णीने अनेक दिग्गज चित्रपटांत भूमिका केलेली आहे. राम लाखन, वक्त हमारा है, क्रांतीवीर, करण अर्जुन, सबसे बडा खिलाडी, आंदोलन, बाजी अशा सुप्रसिद्ध चित्रपटांत ममता कुलकर्णीने काम केलेलं आहे. 2002 साली तिचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
2000 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आले होते नाव
ममता कुलकर्णी ही अभिनेत्री कधीकाळची प्रसिद्ध अभिनेत्र्यांपैकी एक होती. तिला चित्रपटात घेण्यासाठी दिग्दर्शक आतूर असायचे. मात्र 2016 नंतर तिच्या करिअरला उतरती कळा लागली. 2016 मध्ये ठाणे पोलिसांनी 2000 कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात ममता कुलकर्णीला आरोपी केले होते.
हेही वाचा :