Sunil Pal Missing : सुनील पाल (Sunil Pal) आपल्या शोसाठी अनेकदा मुंबईबाहेर जातात. पण नुकतीच सुनील पाल यांच्या बाबतीत धक्कादायक बातमी समोर आली होती. सुनील पाल हे मुंबईच्या बाहेर कार्यक्रमासाठी गेलो होते, पण ते परतले नसल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने पोलिसांत केली होती. आता मात्र सुनील पाल यांचा पोलिसांनी शोध घेतला आहे. कित्येक तास त्यांचा फोन ट्राय केला पण त्यांचा फोन लागत नसल्याचंही त्यांच्या पत्नीने सांगितलं होतं. पोलिसांनी संपर्क केला असताना बऱ्याच वेळानी सुनील पाल यांच्याशी संपर्क झाला.
कॉमेडियन सुनील पाल गेल्या अनेक तासांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती. कॉमेडियनच्या पत्नीने सांताक्रुझ पोलिस ठाण्यात ही माहिती दिली. सुनील पाल यांच्या पत्नीने सांताक्रूझ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास घेतला असता अवघ्या काही तासांमध्ये सुनील पाल यांचा शोध लागला.
सुनील पाल यांच्या पत्नीने काय म्हटलं?
सुनील पाल अनेकदा आपल्या शोसाठी मुंबईबाहेर जातात. त्यांच्या पत्नीने पोलिसांत सांगितलं होतं की, सुनील अनेकदा मुंबईत कार्यक्रम करायला जातो. यावेळी देखील तो कार्यक्रमासाठी बाहेर गेला होता. पण अद्यापही परतले नाहीये. त्याच्याशी कोणताही संपर्कही होऊ शकलेला नाही.
सुनील पाल यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक कॉमेडी शो केले. त्यांच्या कॉमेडीमुळे त्यांनी आजवर अनेकांची मनं जिंकली आहे. आपल्या शब्दांनी प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. एवढेच नाही तर सुनील पाल यांनी अभिनयातही नशिब आजमवलं आहे. त्याने 'फिर हेरा फेरी', 'अपना सपना मनी मनी', 'बॉम्बे टू गोवा' आणि 'किक' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
सुनील पालचं अपहरण?
कॉमेडियन सुनील पाल 2005 मध्ये टीव्हीवर आलेल्या 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'मध्ये दिसले होते. स्टँडअप कॉमेडीयन म्हणून तो प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरले. पण आता अनेक वेळापासून सुनीलशी काही संपर्क होत नसल्याने त्याचं अपहरण तर केलं नाही ना? अशा शंका उपस्थित केल्या जात होत्या. यावर्षी सुनील पाल 'द ग्रेट इंडियन कपिल शो'वर टीका केल्यामुळे चर्चेत आले होते.
सुनील पाल शेवटचा 'तेरी भाभी है पहले' चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट 2018 साली आला होता. यानंतर ते मोठ्या पडद्यावर दिसले नाही. मात्र, कॉमेडियन कपिल शर्मासोबत त्यांची चांगली मैत्री पाहायला मिळाली. सुनील बऱ्याच दिवसांपासून कॉमेडी शो करून पैसे कमवत आहेत. सोशल मीडियावरही ते चांगलेच सक्रिय दिसतात. ते अनेकदा रील बनवून चाहत्यांना हसवतात.