Bharat Bandh : नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने आज, म्हणजेच 8 डिसेंबरला 'भारत बंद' पुकारण्यात आला आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. अशा परिस्थितीत 8 डिसेंबरला 'भारत बंद' कसा होईल, हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. दरम्यान या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.


जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून 'भारत बंद'ला देखील समर्थन दर्शवलं आहे. तसेच, देशव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्य व केंद्रशासित प्रदेशांना नियमावली पाठवण्यात आली आहे. नियमावली पाठवताना केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना भारत बंद दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा आणि शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सांगितले आहे. याव्यतिरिक्त, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासकांनी कोविड -19 च्या मार्गदर्शक तत्त्वांचे
पालन केले पाहिजे. सोशल डिस्टन्स राहिल याची काळजी घेतली पाहिजे.


जाणून घ्या शेतकऱ्यांच्या भारत बंदशी निगडीत 10 मोठ्या गोष्टी :


1. सर्वांना 'सांकेतिक' बंदमध्ये सहभागी होण्याचं आव्हान करत शेतकरी प्रतिनिधींनी म्हटलं आहे की, "आंदोलनातंर्गत सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत ते 'चक्का जाम' आंदोलन करतील. ज्यादरम्यान, प्रमुख रस्त्यांवर आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनातंर्गत उत्तरेकडील राज्यांमध्ये खासकरुन पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत.


2. शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की, "आमचा भार बंद राजकीय पक्षांच्या बंदपेक्षा वेगळा असणार आहे. हा विचारधारेमुळे करण्यात येणारा चार तासांचा सांकेतिक बंद आहे. सामान्या माणसांना कोणताही त्रास होऊ नये त्यासाठी आम्ही या वेळेत त्यांनी प्रवास करु नये, असं आवाहन करतो." पुढे बोलताना ते म्हणाले की, "आम्ही दुकानदारांनाही या वेळेत आपली दुकानं बंद ठेवण्याची विनंती करतो."


3. भारतीय शेतकरी एका संघटनेचे अध्यक्ष जगजीत सिंह दल्लेवाल यांनी शेतकऱ्यांना शांतता राखण्याचं आव्हान केलं आहे. तसेच भारत बंद व्यवस्थित पार पाडण्यासाठी कोणावरही जबरदस्ती न करण्याचं आव्हान केलं आहे. तसेच ते म्हणाले की, "भारत बंद दरम्यान, आपत्कालीन सेवांना सूट देण्यात आली आहे."


4. अनेक नेत्यांनी दावा केला आहे की, भारत बंद संपूर्ण देशात प्रभावी असणार आहे. शेतकरी नेते बलबील सिंह राजेवाल यांनी सांगितलं की, "मोदी सरकारला आमच्या मागण्या मान्य कराव्या लागतील. आम्ही नव्या कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहोत."


5. केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्या भारत बंदच्या एका दिवसांनी म्हणजेच, 9 डिसेंबरला सहाव्या फेरिची बैठक पार पडणार आहे. कारण मागील बैठक निष्फळ ठरली आहे. विरोधी पक्षांनी शेतकरी आंदोलनाला दिलेला पाठिंब्यानंतर भाजपनं त्यांची विचारसरणी अत्यंत लज्जास्पद आणि दुटप्पी असल्याचं म्हटलं आहे.


रविशंकर प्रसाद पुढे बोलताना म्हणाले की, "आम्ही विरोधी पक्ष, विशेषतः काँग्रेस, राष्ट्रवादी आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर पक्षांच्या लज्जास्पद दुहेरी मानसिकता देशासमोर आणण्यासाठी आलो आहोत. जेव्हा यांचं राजकीय अस्तित्व संपत आलं आहे, त्यावेळी ते वाचवण्यासाठी ते कोणत्याही सरकार विरोधी आंदोलनात सहभागी होत आहेत." रविशंकर प्रसाद म्हणाले की, "जे आम्ही केलं, यूपीए सरकारही तेच करत होती."


6. शेतकरी आंदोलनाला सेलिब्रिटी, खेळाडू आणि मजूर संघटनांसह विविध वर्गातील लोकांनीही समर्थन दर्शवलं आहे. जवळपास 95 लाख ट्रक मालक आणि इतरांचं प्रतिनिधित्व करणारी देशभरातील ट्रान्सपोर्ट संस्थांची मुख्य संस्था ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट काँग्रेस (एआईएमटीसी) ने सांगितलं की, बंदच्या समर्थनार्थ ते संपूर्ण देशात आपलं संचलन बंद ठेवणार आहे. अशातच आजच्या भारत बंदचा वाहतूक सेवांवरही परिणाम होऊ शकतो.


7. भारत बंदच्या दिवशी शेतकरी संघटनांनी दूध, फळे आणि भाजीपाल्याच्या सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, म्हणजे तुम्हाला 8 डिसेंबरला या सेवा मिळणार नाहीत. विशेष म्हणजे, रविवारी दिल्लीत निषेध करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांचा अकरावा दिवस आहे. 8 डिसेंबरला शेतकर्‍यांनी भारत बंद पुकारला आहे.


8. सीएआयटी आणि ऑल इंडिया ट्रांसपोर्टर्स वेलफेयर एसोसिएशनने सांगितलं की, दिल्लीसह देशभरात बाजार खुले राहणार आहेत, तसेच परिवहन सेवाही सुरु राहतील.


9. शेतकरी आंदोलनाला बॉलिवूड सेलिब्रिटींनीही पाठिंबा दर्शवला आहे. प्रियंका चोप्रा, सोनम कपूर यांच्यासह अनेक कलाकारांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यात रितेश देशमुख, हंसल मेहता, गौहर खान, चित्रांगदा सिंह यांचा समावेश आहे. अभिनेता दिलजीत दोसांझने तर या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक कोटी रुपये दिले आहेत.


10. राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांशिवाय या बंदला अनेक बॅंक कर्मचारी संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे. बॅंक यूनियन्सने सरकारला लवकरात लवकर या मुद्द्यावर तोडगा काढावा असं आवाहन केलं आहे. ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉइज असोसिएशन (एआयबीईए)नं म्हटलं आहे की, सरकारने पुढं येऊन देश आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या मागण्यांवर विचार करुन समाधान केलं पाहिजे.


महत्त्वाच्या बातम्या :