मुंबई : सिनेअभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने कुपोषण मुक्तीसाठी पुढाकार घेतला असून पालघर जिल्ह्यातील दोन गावे दत्तक घेतली आहेत. यामध्ये पालघर तालुक्यातील पथराळी तर जव्हार तालुक्यातील साकुर गावाचा समावेश आहे.


या दोन्ही ग्रामीण भागात असलेल्या गावांमध्ये नागरिकांना मदत व्हावी या उद्देशाने ॲक्शन अगेन हंगर फाउंडेशन या संस्थेसोबत हात मिळवणी केली असून पालघरच्या या प्रकल्पासाठी तिने या संस्थेसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या प्रकल्पांतर्गत 1550 कुपोषित यांना पोषक अन्न मिळणार आहे. पुढील तीन वर्षासाठी या सर्वांना आवश्यक असलेले सकस आहार उपलब्ध केले जातील यासाठी विविध स्तरावर सकस आहार यावर आधारित शिबिरेही आयोजित केली जाणार आहेत. बालके, स्तनदा व गरोदर माता यांच्यासाठी या प्रकल्पांतर्गत सकस आहार उपलब्ध होणार आहे.


आपल्या योगदानाने ग्रामीण बहुल भागातील कुपोषण नियंत्रणासाठी आपला एक छोटासा प्रयत्न असल्याचे जॅकलिनचे म्हणणे आहे. कोरोना काळाच्या कठीण परिस्थितीत तिने ही दोन गावे दत्तक घेऊन येथील कुपोषण नियंत्रण आणण्यासाठी उचललेली पावले कौतुकास्पद आहेत असे हंगर फाउंडेशन यांनी सोशल मीडियावर सांगितले आहे.


संबंधित बातम्या :