Actress Deepika Padukone and sandeep reddy vanga : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पटकथालेखक संदीप रेड्डी वंगा (sandeep reddy vanga) सध्या आपल्या आगामी चित्रपट ‘स्पिरिट’ मुळे चर्चेत आहेत. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे संदीप यावेळी थेट इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणशी (Actress Deepika Padukone) पंगा घेतल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दीपिकाने (Actress Deepika Padukone) अलीकडेच वंगा यांच्या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे दोघांमधील वाद आणखीनच वाढलेला दिसतो. काय आहे नेमकं प्रकरण? चला सविस्तर जाणून घेऊया.
दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा याने कोणते आरोप केले आहेत?
अलीकडेच संदीप रेड्डी वंगा (sandeep reddy vanga) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. जरी त्यांनी थेट दीपिकाचे नाव घेतले नाही, तरीही त्यांनी अप्रत्यक्षरित्या तिच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले की, "जेव्हा मी एखाद्या कलाकाराला स्क्रिप्ट ऐकवतो, तेव्हा मी त्याच्यावर 100% विश्वास ठेवतो. आमच्यात एक अनोखा करार असतो."
वंगांचा आरोप आहे की, दीपिकाने या कराराचे उल्लंघन केले. ही एक प्रकारे एका तरुण कलाकाराला अनुचित वागणूक आहे. त्यांनी या वागणुकीला ‘फेमिनिझम’च्या नावाखाली असलेली नकारात्मक वृत्ती म्हणत नावे ठेवली. ते पुढे म्हणाले की, त्यांनी या चित्रपटासाठी अनेक वर्षे मेहनत केली, पण दीपिकाला त्याचे महत्त्वच कळले नाही. हे वक्तव्य संदीप वंगा रेड्डी याने त्या वेळी केले, जेव्हा दीपिकाने आधीच ‘स्पिरिट’ या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला होता.
दीपिका पदुकोणने का सोडला चित्रपट?
बॉलिवूड हंगामा या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, दीपिकाने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनेकदा 6 तासांपेक्षा जास्त वेळ काम करण्यास नकार दिला आणि तिने आपल्या करारात काही बदल करण्याची मागणी केली. सूत्रांनी सांगितले की, जर शूटिंग 100 दिवसांपेक्षा जास्त चालले, तर तिला अतिरिक्त मोबदला दिला जावा, अशी तिची अट होती. यामुळे निर्माते आणि दिग्दर्शकांमध्ये मतभेद झाले आणि अखेरीस दीपिकाने हा प्रोजेक्ट सोडण्याचा निर्णय घेतला.
दीपिकाला चाहत्यांचा पाठिंबा
दरम्यान, वंगा रेड्डीच्या टीकेनंतर आणि दीपिकाच्या या मागण्यांवर समाजमाध्यमांवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेष म्हणजे दीपिका नुकतीच आई बनली आहे आणि तिने आपल्या काम आणि खासगी आयुष्यात समतोल राखण्यावर भर दिला आहे. याशिवाय ती मानसिक आरोग्याबाबत जनजागृतीसाठीही कार्यरत आहे. त्यामुळे तिच्या काही मागण्या योग्य असल्याचेही मानले जात आहे. या वादावर सध्या बॉलिवूडमधील अनेकांचे लक्ष लागले आहे. आता यावर दीपिका काय प्रतिक्रिया देणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या