Dam Water Storage: राज्यभरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही तुफान पाऊस सुरू आहे. पहिल्याच दिवशी मान्सूनच्या पावसाने रेकॉर्ड ब्रेक केला असून पाणलोट क्षेत्रात मे महिन्यात पहिल्यांदाच पाणी वाढण्यास सुरुवात झाली आहे. यंदा धरणे लवकर भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे, सोलापूर, सातारा सांगली या भागात तुफान पाऊस झाल्याने धरण साठ्यात वाढ होत आहे. दोन दिवसात झालेल्या पावसाने 45 वर्षात पहिल्यांदाच मे महिन्यात उजनी धरण प्लसमध्ये आले आहे.  राज्यभरातील लघु मध्यम व मोठ्या प्रकल्पांमध्ये धरण साठा वेगाने वाढत आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील एकूण धरणांमध्ये आता 28.45% पाणीसाठा शिल्लक आहे. या जलसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. 

Continues below advertisement


45 वर्षात पहिल्यांदाच मे महिन्यात उजनी प्लसमध्ये


सोलापूर , धाराशिव, पुणे आणि नगर जिल्ह्यासाठी महत्त्वाचे समजलं जाणारा उजनी धरण मे महिन्यात पहिल्यांदाच उपयुक्त साठ्यात प्लस मध्ये आले आहे.  मान्सूनपूर्व पावसामुळे उणे 20 टक्क्यांवर पोहोचलेला उजनीतील पाणीसाठा 45 वर्षांमध्ये पहिल्यांदाच मे महिन्यात प्लसमध्ये आला आहे.  25 आणि 26 मे रोजी झालेल्या पावसाने उजनी धरणामध्ये पाणी पातळीत वाढ झाली आहे.


राज्यात कोणत्या विभागात किती पाणीसाठा?


राज्यभरात झालेल्या पावसाने कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर व विदर्भातील धरण पातळीत वाढ होत आहे. राज्याचा आजचा धरण साठा 28.45 टक्क्यांवर आहे.  नाशिक विभागात 30 टक्के उपयुक्त पाणीसाठा असून पुणे विभागात 21.76 टक्के जलसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यात 28.37% जलसाठा या घडीला शिल्लक असून गेल्यावर्षी हा पाणीसाठा 11.8 टक्क्यांवर होता. कोकण विभागातील धरणे 35.75 टक्क्यांवर भरली आहेत. नागपूरअमरावती विभागात 33.52 व 39.70% अनुक्रमे जलसाठा उपलब्ध आहे. 


मराठवाड्यात धरण साठ्याची काय स्थिती?


मराठवाड्यातील सर्वात मोठे  जायकवाडी धरण सध्या 29.65 टक्क्यांवर आले आहे. गेल्यावर्षी याच दिवशी जायकवाडी मध्ये 5.15% पाणी होते. गेल्यावर्षी शून्यावर असलेले बीड मधील मांजरा धरण 20 टक्क्यांवर आहे. शून्य टक्यांवर असलेले याचं माजलगाव धरण 3.89 टक्क्यांवर आले आहे. हिंगोलीतील सिद्धेश्वर धरणात 18.82% तर येलदरी धरणात 49.71% पाणीसाठा शिल्लक आहे.
नांदेडच्या विष्णुपुरी धरणात 19.59% जलसाठा आहे. धाराशिव मधील निम्नतीरणात 54.33 टक्क्यांवर असून परभणीतील निम्न दुधना 32.19 टक्क्यांवर आले आहे. गेल्या वर्षी निम्न दुधनामध्ये याच सुमारास शून्य टक्के पाणीसाठा होता. 


नाशिक नगरच्या धरणांमध्ये पाणी किती?


नगर मधील भंडारदरा धरणामध्ये 25.43% मुळा 18.66% तर निळवंडे धरणात 25.15% पाणी शिल्लक आहे.  नाशिकच्या दारणा धरणामध्ये 35.71 गंगापूर 44.42 गिरणा 21.91 तर वितरण 38.2% वर आहे. 
पुणे विभागात कुठे काय स्थिती? पुण्यातील खडकवासला धरणात 46.13% पाणी शिल्लक असून पानशेत 17.97 पवना 26.23% तर भाटघर 0.48 टक्क्यांवर आहे. कोल्हापुरात दूधगंगा धरणात 13.79% पाणीसाठा आता आहे. राधानगरी 43.75 टक्क्यांनी भरले आहे. सांगलीतील वारणा धरणात 24.89% पाणी, शिल्लक असून साताऱ्यातील कोयना धरण 19.8% नी भरले आहे.


हेही वाचा:


Kondeshwar Temple Waterfall : खुशखबर! पहिल्याच पावसात बदलापूरचा कोंडेश्वर धबधबा प्रवाहित; पर्यटकांची एकच गर्दी