मुंबई : कोरोनाची लागण झालेला लोकप्रिय यूट्यूबर, सोशल मीडिया स्टार आणि अभिनेता अशी ओळख असलेल्या राहुल वोहरांचं कोरोनानं निधन झालं आहे. दिल्लीतील द्वारका येथील आयुष्मान हॉस्पिटलमध्ये आज सकाळी 35 वर्षीय राहुल यांचा मृत्यू झाला.  


राहुल वोहरा यांनी 8 दिवस दिल्लीच्या ताहिरपूर येथील राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये भर्ती होते. मात्र तिथल्या उपचारांवर ते नाखुश होते. अशात त्यांनी तब्येत बिघडत चालल्याने त्यांनी चांगल्या दवाखान्यात भर्ती करण्याबाबत पोस्ट लिहिली होती.  विशेष म्हणजे मृत्यूच्या आधी एक दिवस आधी त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहीली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, - "मलाही ट्रीटमेंट चांगली मिळाली असती तर मी वाचलो असतो. आपलाच Irahul Vohra". या पोस्टमध्ये त्यांनी हॉस्पिटलशी संबंधित सर्व डिटेल्स दिल्या आहेत. सोबतच पंतप्रधान मोदी आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना टॅग केलं होतं.


रविवारी दुपारी राहुल वोहरा यांच्यावर अंत्यसंस्कार करुन आलेल्या अस्मिता थिएटर ग्रुपचे प्रमुख आणि दिग्दर्शक अरविंद गौर यांनी राहुल यांच्या निधनावर बोलताना म्हटलं की,  राहुलला शनिवारी आम्ही राजीव गांधी हॉस्पिटलमधून आयुष्मान हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. मात्र दुर्देवाने आम्ही त्याला वाचवू शकलो नाही. त्यांनी सांगितलं की, कोरोनामुळं राहुलच्या लंग्समध्ये खूप इन्फेक्शन झालं होतं. राहुल हा प्रतिभावान कलाकार आणि चांगला गुणी विद्यार्थी होता, असं अरविंद यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं. 


 चर्चित यूट्यूबर होण्याआधी  राहुल 2006 ते 2011 दरम्यान अरविंद गौर यांच्याशी थिएटर ग्रुपच्या माध्यमातून जुळले होते. त्यांच्यासोबत अनेक नाटकांमध्ये राहुल यांनी काम केलं होतं.  नेटफ्लिक्सवर आलेला चित्रपट  'अनफ्रीडम' मध्येही त्यांनी काम केलं होतं.