Actor Producer Dheeraj Kumar Died: बॉलिवूड (Bollywood News) आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतलं (Television Industry) मोठं नाव, प्रसिद्ध निर्माते आणि दिग्गज दिग्दर्शक धीरज कुमार (Dheeraj Kumar) यांचं निधन झालं झालं. वयाच्या 79व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना न्यूमोनिया झालेला, त्यातच त्यांची तब्येत बिघडली, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. पण, खूप कॉम्लिकेशन्स असल्यामुळे त्यांचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं आहे. 

धीरज कुमार (Actor Dheeraj Kumar) यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यूमोनिया झाल्यानं धीरज कुमार यांची प्रकृती ढासळली आणि त्यांना तातडीनं कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना रुग्णालयातील आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. ते बरं होऊन घरी परततील अशी आशा होती, पण सर्व प्रयत्न करूनही त्यांची प्रकृती सुधारली नाही. धीरज कुमार यांच्या कुटुंबीयांनी या कठीण काळात त्यांच्या प्रायव्हसीची काळजी घेण्याचीही विनंती केली आहे.

अलीकडेच, धीरज कुमार नवी मुंबईतील खारघर भागात असलेल्या इस्कॉन मंदिराच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते. जिथे त्यांनी पंतप्रधान मोदींच्या सनातन धर्माच्या प्रसाराच्या प्रयत्नांचं कौतुक केलं होतं. या काळात ते पूर्णपणे ठीक दिसत होते. त्यांच्याकडे पाहून कोणीही विचार केला नसेल की, ते आज आपल्यात नसतील.

CINTAA नं  ट्विटरवर अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि लिहिलंय की, "श्री धीरज कुमार जी यांच्या निधनानं आम्हाला दुःख झालंय. ते 1970 पासून CINTAA चे एक आदरणीय सदस्य आहेत. आम्ही त्यांचं योगदान आणि उपस्थिती नेहमीच लक्षात ठेवू. त्यांच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांना आमच्या संवेदना. ओम शांती."

टॅलेंट शोद्वारे घेतलेली एन्ट्री

धीरज कुमार यांनी 1965 मध्ये मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला. ते एका टॅलेंट शोचे फायनलिस्ट होते, ज्यामध्ये सुभाष घई आणि राजेश खन्ना देखील त्यांच्यासोबत होते. राजेश खन्ना त्या शोचे विजेते ठरले. त्यांनी 1970 ते 1984 दरम्यान 21 पंजाबी चित्रपटांमधून आपला दमदार अभिनयानं सर्वांच्या मनावर आपली छाप सोडली. त्यानंतर त्यांनी 'हीरा पन्ना', 'रतों का राजा', 'सरगम', 'बहरूपिया', 'रोटी कपडा और मकान' यासह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी टेलिव्हिजन विश्वातही उत्कृष्ट काम केलं. त्यांनी प्रेक्षकांना 'ओम नमः शिवाय', 'कहां गये वो लोग', 'अदालत', 'ये प्यार ना होगा काम', 'सिंघासन बत्तीसी' आणि 'मैका' असे लोकप्रिय शो दिले आहेत. रिअॅलिटी शोद्वारे मनोरंजन उद्योगाचा भाग बनलेल्या धीरज कुमार यांनी 'क्रिएटिव्ह आय' ही निर्मिती कंपनी देखील सुरू केली. ते कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Ashutosh Rana On Hindi-Marathi Language Row: 'भाषा वादाचा नाही, संवादाचा विषय...'; मराठी-हिंदी भाषेच्या मुद्द्यावर आशुतोष राणांचं मोठं वक्तव्य, नेटकरी खूश, पाठ थोपटली!