Ashutosh Rana On Hindi-Marathi Language Row: महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra Government) केंद्राच्या त्रिभाषा धोरणातंर्गत राज्यातही त्रिभाषा सूत्र राबवण्यासंदर्भात जीआर काढला होता. तेव्हापासूनच राज्यात मराठी विरुद्ध हिंदी भाषा (Marathi Language And Hindi Language Row) या वादाला तोंड फुटलं. वाढत्या विरोधानंतर राज्य सरकारनं जीआर मागे घेतला खरा, पण तरीसुद्धा हा वाद संपण्याचं नाव काही घेईना. राज्यभरात नाहीतर संपूर्ण देशभरात या भाषावादाची झळ पोहोचली आहे. यावर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. आतापर्यंत अनेक सिनेकलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच आता अभिनेता आशुतोष राणा यांनी यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांच्या आगामी 'हीर एक्सप्रेस' चित्रपटाच्या ट्रेलर लाँच (Trailer Launch Of Film Heer Express) कार्यक्रमादरम्यान अभिनेते आशुतोष राणा (Actor Ashutosh Rana) यांना एक प्रश्न विचारण्यात आलेला. त्यावर बोलताना आशुतोष राणा यांनी मराठी (Marathi Language) आणि हिंदी भाषावादावर (Hindi Language) आपलं मत व्यक्त केलं आहे. 

Continues below advertisement

आशुतोष राण यांच्या मते, कोणतीही भाषा ही संवादाचं साधन असते आणि त्यावरून कोणताही वाद होऊ नये. आशुतोष राणा हिंदी-मराठी वादावर आपलं मत मांडताना म्हणाले की, "माझा वैयक्तिक विश्वास आहे की, भाषा हा संवादाचा विषय आहे. भाषा कधीही वादाचा विषय नसते. म्हणून भारत हा एक परिपक्व आणि अद्भुत देश आहे, जिथे त्यानं सर्व गोष्टी स्वीकारल्या आहेत आणि तो संवादावर विश्वास ठेवतो. भारत कधीही वादावर विश्वास ठेवत नाही."

नेटकऱ्यांनी थोपटली आशुतोष राणांची पाठ 

अभिनेते आशुतोष राणा यांच्या प्रतिक्रियेनं लोकांची मनं जिंकली आहेत आणि प्रत्येकजण त्यांचं कौतुक करत आहे. एका युजरनं लिहिलंय की, "आशुतोष राणा कोणत्याही विषयावर उत्तम बोलतो..." दुसऱ्या युजरनं लिहिलंय की, "तू अगदी बरोबर बोललास...' तर, आणखी एका युजरनं लिहिलंय की, "तू हे इतक्या चांगल्या भाषेत स्पष्ट केलं आहेस..."

हिंदी-मराठी भाषेचा वाद काय आहे?

महाराष्ट्र सरकारनं सरकारी प्राथमिक शाळांमध्ये इंग्रजी आणि मराठी व्यतिरिक्त हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवणं सक्तीचे केलेलं. सरकारनं आदेशात म्हटलेलं की, संघीय धोरणानुसार मुलांना शाळेत तीन भाषा शिकवणं आवश्यक आहे. यानंतर हिंदी आणि मराठीबाबत वाद सुरू झाला. महाराष्ट्रात वाढता वाद पाहून राज्य सरकारनं आपला निर्णय मागे घेतला. यासोबतच त्रिभाषा धोरणाचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. मात्र, त्यानंतरही राज्यात भाषेवरून वाद सुरूच आहे.

कधी रिलीज होणार 'हीर एक्सप्रेस'? 

'हीर एक्सप्रेस' बद्दल बोलायचं झालं तर, आशुतोष राणा यांच्या व्यतिरिक्त, दिव्या जुनेजा आणि प्रीत कामानी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. उमेश शुक्ला यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाद्वारे दिव्या जुनेजा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात गुलशन ग्रोव्हर, संजय मिश्रा आणि मेघना मलिक देखील दिसणार आहेत. हा चित्रपट 8 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या: 

Jaya Bachchan Scolds Shweta Bachchan: 'प्रत्येकवेळी मी... मी... मी...'; जया बच्चन लाईव्ह पॉडकास्टमध्ये ऑन कॅमेरा लेक श्वेता नंदावर चिडल्या