मुंबई : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवर बोलताना आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali), रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत धस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. विशेष म्हणजे यावेळी प्राजक्ता माळी भावुकही झाली. दरम्यान, प्राजक्ताच्या पत्रकार परिषदेनंतर अनेक कलाकार तिला पाठिंबा देत आहेत. कलाकारांना अशा प्रकारे लक्ष्य करणं चुकीचं आहे, असं मत ते मांडत आहेत. अभिनेता कुशल बद्रीकेनेही सोशल मीडियावर पोस्ट करत प्राजक्ता माझा तुला पाठिंबा आहे, असे जाहीरपणे सांगितले आहे. 


मी सुद्धा नाचताना कंबर हलवली


कुशल बद्रीकेने इन्स्टाग्रावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये कुशल बद्रीकेने राजकारण्यांना चांगलेच सनावले आहे आहे. "कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सुद्धा तीन ते चार वेळा परळीला गेलोय. काय ते परळी पॅटर्न का काय म्हणतात तशी मी सुद्धा नाचताना कंबर हलवली आहे. पण मला त्याचं कधी काही वाटलं नाही. वाटलं किती छान कलाकारांचा सन्मान करणारं शहर आहे. पण आता मात्र 'धस' होतंय काळजात. कुणाचं ठाऊक स्वतःची पोळी भाजण्यासाठी आपल्या कमरेतसुद्धा एखाद्याला इंटरेस्ट यावा. बिडमध्ये झालेल्या खुनाचा निषेध आणि प्राजक्ता माळीच्या चारित्र्याचा खून करू पाहणाऱ्या वृत्तीचाही निषेध, असं कुशल बद्रीके म्हणाला आहे. तसेच प्राजक्ता मी तुझ्यासोबत आहे, असं म्हणत प्राजक्ता माळीलाही त्याने धीर दिलाय. 


कुशल बद्रीकेची इन्स्टाग्राम पोस्ट




विकृतीकडे प्रवास चालू झाला


महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनीदेखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच नृत्यांगणा गौतमी पाटील हिनेदेखील प्राजक्ता माळीला पाठिंबा दिला आहे. राज्यातील प्रसारमाध्यमं आणि राजकीय नेते यांचा विकृतीकडे प्रवास चालू झाला आहे. महाराष्ट्राने प्राजक्ता माळीसोबत ठामपणे उभे राहिले पाहिजे.  मला क्षेत्र किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रातील बदनामी ही पुरुषप्रधान मनोवृत्तीचाच एक भाग आहे, असे म्हणत त्यांनी प्राजक्ता माळीला पाठिंबा दिला आहे. 


हेही वाचा :


Prajakta Mali : प्रवास विकृतीकडे सुरू झालाय..., प्राजक्तासाठी सिनेसृष्टीतून प्रतिक्रिया; सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर राजकारण्यांवर व्यक्त केला तीव्र संताप


बीड घटनेवरुन फुलवंतीचा संताप; प्राजक्ता माळीची पत्रकार परिषद; धस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणार


Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या