Allu Arjun : पुष्पाची क्रेज कायम ठेवत अल्लू अर्जुन (Allu Arjun) प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. याचा नुकताच अनुभव त्यालाही आला. एका उमेदवाराच्या प्रचारासाठी गेला असता चाहत्यांची तुफान गर्दी अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी जमली. अल्लू अर्जुन वाएसआरसीपीचे उमेदवार सिल्पा रवी म्हणजेच सिंगारेड्डी रविंचद्र किशोर रेड्डी यांच्या प्रचारासाठी पोहचला. त्याला पाहण्यासाठी लाखो लोकांची गर्दी पाहायला मिळाली. 


पण अल्लू अर्जुनने केलेला हा प्रचार त्याला चांगलाच भोवला असल्याचं चित्र सध्या आहे. कारण या प्रचारानंतर अल्लू अर्जुनच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अल्लू अर्जुन आल्यानंतर तिथे लोकांनी पुष्पा पुष्पा म्हणून घोषणा देऊ लागले. पण अल्लू अर्जुनने आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. नेमकं काय प्रकरण आहे त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 


अल्लू अर्जुनकडून आचारसंहितेचं उल्लंघन?


अल्लू अर्जुनला सिल्पा रेड्डी यांनी आमंत्रित केले होते. पण अल्लू अर्जुनला निमंत्रित केल्याविषयी सिल्पा रविचंद्रा यांनी नंद्यालच्या ROना कोणत्याही प्रकारची कल्पना दिली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अल्लू अर्जुन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरओला कल्पना दिली नसल्यामुळे अल्लू अर्जुनने आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा दावा तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.


अल्लू अर्जुन निवडणुकांच्या प्रचारात


अल्लू अर्जुन आणि त्याची पत्नी स्नेहा रेड्डी ही वायएसआरसीपीचे उमेदवार सिल्पा रवी रेड्डी यांच्या प्रचारासाठी नांद्याल येथे पोहचले. येत्या 13 मे रोजी या भागात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्याआधी प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी या उमेदवाराच्या प्रचारासाठी अल्लू अर्जुन मैदानात उतरला. इतकच नव्हे त्याला पाहण्यासाठी लाखोंच्या जनसमुदायाची झुंबड पाहायला मिळाली.  


अल्लू अर्जुनचे काकाही लोकसभेच्या रिंगणात


अल्लू अर्जुनचे काका हे पीठापुरम लोकसभा मतदारसंघातून जनसेवा पक्षाकडून लोकसभेच्या रिंगणात आहेत. त्यांना देखील पाठिंबा दर्शवण्यासाठी अल्लू अर्जुन प्रचाराच्या मैदानात दिसला. त्याचप्रमाणे नंद्यालमधून त्याचे मित्र आणि वाएसआरसीपीचे उमेदावर सिल्पा रवी रेड्डी यांना पाठिंबा देण्यासाठीही अल्लू अर्जुन प्रचार करताना दिसला.  






ही बातमी वाचा : 


Allu Arjun : लोकसभेच्या प्रचारात 'पुष्पा फायर'! अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी; पाहा व्हिडिओ