Amitabh Bachchan, Abhishek Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. अमिताभ यांचा मुलगा  अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan)चा दसवी हा आज (7  एप्रिल) रिलीज झाला आहे. अभिषेक या चित्रपटाचं प्रमोशन सध्या करत आहे. प्रमोशन दरम्यान नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अभिषेकनं एक किस्सा सांगितला आहे. 


अभिषेखनं मुलाखतीमध्ये सांगितलं की, तो शिक्षणासाठी  स्वित्झर्लंडमधील एका  बोर्डिंग स्कूलमध्ये  गेला होता. तेव्हा तो त्याला परिक्षेत मिळालेले ग्रेड बिग बींना सांगतद नव्हाता. त्याला परिक्षेत कमी गुण मिळत होते. त्यामुळे तो त्याचं रिपोर्ट कार्ड लपवून ठेवत होता. एकदा बिग बींनी त्याचं रिपोर्ट कार्ड पाहिलं त्यावेळी इंटरकॉमवर अमिताभ यांनी अभिषेकला फोन केला. त्यानंतर बिग बी अभिषेकवर भडकले. पण न ओरडता बिग बी यांनी अभिषेकला सांगितलं की, बेटा मी एवढे कष्ट करून पैसे कमावतो आणि तू अभ्यासाकडे का लक्ष देत नाहीस. तिला जबाबदारपणे वागावे लागेल. 


जेव्हा अमिताभ यांना चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हते
‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये अमिताभ यांनी सांगितले होते, '21 वर्ष झाली आहे. 2000 मध्ये मी या शोचे सूत्रसंचालन करण्यास सुरूवात केली. तेव्हा अनेक जण असे म्हणत होते की चित्रपटांमधून अमिताभ टेलिव्हीजनमध्ये जात आहेत. यामुळे त्यांच्या इमेजवर वाईट परिणाम होऊ शकतो. पण त्यावेळी मला चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हते. पण नंतर जेव्हा या शोचा एपिसोड प्रदर्शित झाला. तेव्हा खूप चांगलं वाटलं. '


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha