Abhishek Bachchan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चननं (Abhishek Bachchan) आराध्या बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांच्यासोबत कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. आता हे सर्वजण भारतामध्ये परत आले आहेत. पण भारतामध्ये परत आल्यावर अभिषेकवर दु:खाचा डोंगर कोसळला. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे कॉस्ट्यूम डिझायनर अकबर शाहपुरवाला यांचे निधन झाले आहे. अभिषेकनं सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करुन अकबर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अभिषेकनं पोस्टमध्ये लिहिलं, 'घरी परत आल्यावर मला एक बातमी कळाली.अकबर शाहपुरवाला यांचे निधन झाले आहे. मी त्यांना अक्की अंकल, असं म्हणत होतो. माझ्या वडिलांचे सूट आणि कॉस्ट्यूम्स हे त्यांनीच डिझाइन केले होते. त्यांनी तयार केलेला सूट माझ्याकडे अजूनही आहे. तो सूट मी रिफ्यूजी चित्रपटाच्या प्रिमियरमध्ये परिधान केला होता. ते मला नेहमी सांगत होते की, सूट तयार करणे हे केवळ शिलाई करण्याचे काम नाहीये. ती एक भावना आहे. त्यांनी माझे कॉस्ट्यूम्स हे खूप प्रेमाने डिझाइन केले होते. '
पुढे अभिषेकनं लिहिलं, 'माझ्यासाठी ते जगातील सर्वोत्तम सूट तयार करणारे व्यक्ती होते. अक्की अंकल, तुम्ही माझ्यासाठी जे सूट बनवले आहेत, त्यापैकी एक मी आज रात्री परिधान करेल. तुमच्या आत्म्याला शांती लाभो. 'अभिषेकनं या पोस्टसोबतच एक खास फोटो देखील शेअर केला आहे.
पाहा अभिषेकची पोस्ट :
संबंधित बातम्या