Bigg Boss Marathi : बहुप्रतिक्षित बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन (Bigg Boss Marathi Season 5) आता अवघ्या काही तासांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात कुणाची एन्ट्री होणार याची उत्सुकताही शिगेला पोहचली आहे. अनेक कलाकारांची नावं सध्या समोर येत असून वाहिनीकडून नॉन रिव्हिल प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे स्पर्धक हे बिग बॉसच्या घरात दाखल झाले असून आता लवकरच घरात काय राडा होणार याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. 


नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये सुरांच्या बादशाहची एन्ट्री होणार आहे. पण हा सुरांचा बादशाह नेमका कोण आहे? हे येत्या 28 जुलै रोजीच कळेल. पण अनेक गायकांच्या नावाची चर्चा सुरु झाली असून यामध्ये गायक अभिजीत सावंतचं नाव सर्वात जास्त चर्चेत आहे. त्यामुळे आता अभिजीत सावंतच बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणार की दुसरा कोणता स्पर्धक असणार हे काही तासांतच स्पष्ट होईल. 







'बिग बॉस मराठी'च्या घरात 'परदेसी गर्ल'ची एन्ट्री


बिग बॉसच्या घरात एका परदेशी अप्सरेची एन्ट्री होणार आहे. बिग बॉस अधिकृत इंस्टाग्रामवर बिग बॉस मराठीचा नाव प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या नवीन प्रोमोमध्ये एक सुंदरी दिसत आहे. बिग बॉस मराठीमध्ये एका परदेशी अप्सरेची एन्ट्री होणार असल्याचं या प्रोमोमध्ये सांगण्यात आलं आहे. या प्रोमोमुळे बिग बॉसप्रेमींची उत्सुकता आणखी वाढली आहे. या परदेसी गर्लची घरात एन्ट्री किती खास असणार, हे लवकरच पाहायला मिळणार आहे. 


रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार


काही दिवसांपूर्वीच 'बिग बॉस मराठी'चा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रोमोवरुन रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार असल्याचं स्पष्ट झालं. अशातच आता पुन्हा एकदा नव्या पर्वाचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश देशमुख यंदाचा सीझन वाजवायला सज्ज आहे. 


ही बातमी वाचा : 


Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'च्या घरात पहिल्यांदाच येतेय 'परदेसी गर्ल', 'या' अप्सरेच्या तालावर नाचणार इतर स्पर्धक?