Abhangwari : कोरोना काळाआधी म्हणजेच 2018 ते 2019मध्ये मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता पुन्हा एकदा 'अभंगवारी'ची संगीत मैफल रंगणार आहे. 23 जुलै रोजी सायंकाळी साडे सहा वाजता मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात राहुल देशपांडे (Rahul Deshpande) आपल्या सुरेल गायकीने अवघे सभागृह मंत्रमुग्ध करणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्वरी जमेनीस करणार असून, संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित राहून या 'अभंगवारी'ची शोभा वाढवणार आहेत.
नुकतीच भक्तीमय वातावरणात सर्वत्र आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. हेच भक्तिमय वातावरण पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानतर्फे खास या शास्त्रीय संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोनानंतर पुन्हा एकदा रंगणार संगीत मैफिल
कोरोनामुळे जगभरात अनेक गोष्टी विस्कळीत झाल्या होत्या. त्याच प्रमाणे देशभरातील उद्योग-व्यवसायांना देखील कोरोनाचा मोठा फटका बसला होता. या दरम्यान मनोरंजन विश्वावर देखील कोरोनाचे सावट पसरले होते. मनोरंजन उद्योग पूर्णपणे ठप्प झाला होता. इतकंच नाही, तर अनेक दिग्गजांना कोरोनाची लागण देखील झाली होती. मात्र, आता कोरोनाचा कहर कमी होत असताना, पुन्हा एकदा सगळे उद्योग पूर्ववत होत आहेत. ठप्प झालेले मनोरंजन विश्वदेखील आता लोकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहे. लोकांचे पाय पुन्हा एकदा थिएटरकडे वळू लागले आहेत. अशातच 50 टक्के आसन मर्यादेचा नियम रद्द केल्यानंतर, आता नाटकांना आणि लाईव्ह कार्यक्रमांना देखील प्रेक्षकांची गर्दी होऊ लागली आहे.
दिग्गज होणार सहभागी!
याच निमित्ताने पुन्हा एकदा लाईव्ह कार्यक्रमांचे आयोजन होऊ लागले आहे. प्रेक्षकांचा देखील या कार्यक्रमांना उदंड प्रतिसाद मिळत आहे. नुकतीच आपण आषाढी एकादशी साजरी केली. याच खास सणाचं निमित्त साधून तेच भक्तिमय वातावरण पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी ‘वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानतर्फे’ खास या शास्त्रीय संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत. यावेळी अभंग, भक्तिगीते यांचा संगीत नजराणा श्रोत्यांना अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बुकमाय शोवर तिकीटे उपलब्ध आहेत.
हेही वाचा :
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या