Shravan Vastu Tips : श्रावणमासाला (Shravan) सुरुवात झाली आहे. त्यामुळे सगळीकडेच आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. हिंदू धर्म संस्कृतीत श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. हा भगवान शंकराचा (Lord Shiva) तसेच इतर देव-दैवतांचा सर्वात प्रिय महिना मानला जातो. असं म्हणतात की, या पवित्र महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चा केल्याने भक्तांच्या आयुष्यातील सर्व संकटं दूर होतात. शंकराचा आशीर्वाद मिळावा यासाठी श्रावणात काही लोक घरात बेलपत्राचं रोप देखील लावतात. ज्योतिष शास्त्रात, बेलपत्राचं रोप लावणं फार शुभ मानलं गेलं आहे. भगवान शंकराला देखील बेलपत्र फार प्रिय आहे.
मान्यतेनुसार, ज्या घरात बेलपत्राचं रोप असतं त्या घरातील प्रत्येक सदस्यावर भक्तांची कृपा असते. तसेच, त्यांच्या सुख-समृद्धीत चांगली वाढ होते. त्यामुळे, श्रावणात जर तुम्हाला सुद्धा घरी बेलपत्राचं रोप लावण्याची इच्छा असेल तर तुम्हाला वास्तूशी (Vastu Shastra) संबंधित काही गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे.
बेलपत्र लावण्याचे वास्तू नियम (Belpatra Vastu Rules) :
- वास्तूशास्त्रानुसार, घराच्या उत्तर किंवा पश्चिम दिशेला बेलपत्र लावणं फार लाभदायी आहे असं म्हटलं जातं.
- जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करायची असेल तर तुम्ही घराच्या अंगणात सुद्धा बेलपत्राचं रोप लावू शकता. असं म्हणतात की, यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. तसेच, कुटुंबातील सदस्यांचं आरोग्यदेखील उत्तम राहतं.
- घरात बेलपत्राचं रोप असल्याने घरातील सदस्यांची चंद्र दोषापासून मुक्ती मिळते. याचे अनेक शुभ परिणाम देखील आपल्याला पाहायला मिळतात.
- श्रावण महिन्यात बेलपत्राची पूजा करणं फार शुभदायक मानली जाते. मान्यतेनुसार, बेलाच्या झाडावर लाल रंगाचा धागा बांधल्याने राहुच्या अशुभ परिणामांपासून मुक्ती मिळते.
- तसेच, रोपाच्या मुळाशी लाल धागा बांधल्याने तसेच नियमित जल अर्पण केल्याने पितृ दोषापासून मुक्ती मिळते. तसेच, येणाऱ्या समस्या दूर होतात अशी मान्यता आहे.
- त्यामुळे, जर तुम्हीसुद्धा घरात बेलपत्राचं रोप लावणार असाल तर या गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा, तुमच्या समस्या वाढतील असे देखील सांगण्यात आलं आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. )
हे ही वाचा :