Vinesh Phogat Disqualified : भारतीयांच्या ज्या सुवर्णस्वप्नाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, ते स्वप्न आता भंगलं आहे. कारण फक्त काही ग्रॅम वजन जास्त झाल्याने विनेशला (Vinesh Phogat) पॅरिस ऑलम्पिकमधून (Paris Olympics 2024) अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे आता विनेशला अंतिम सामना खेळता येणार नाही. या निर्णयाचा भारताकडून कडाडून विरोध केला जातोय. त्यातच आता एका मराठी दिग्दर्शकाचीही पोस्ट चर्चेत आलीये. 


दिग्दर्शक, अभिनेता हेमंत ढोमे याने त्याच्या सोशल मीडियावर विनेशाच्या कामगिरीवर गौरवास्पद शब्द लिहित पोस्ट केली होती. पण हा निर्णय आल्यानंतर त्याने या निर्णयावर निराशाजनक प्रतिक्रिया दिली आहे. हेमंतने विनेशसाठी पोस्ट करत आता गोल्ड पाहिजेच असं म्हटलं होतं. पण आता या निर्णयावर नाराजीचे सूर उमटत आहेत. 


हेमंतची पोस्ट काय?


हेमंतने त्याच्या सोशल मीडियावर विनेशला अपात्र केल्याची पोस्ट शेअर केली आहे. त्यावर त्याने म्हटलं की, absolutely heartbroken, असं म्हटलं आहे. याआधीने त्याने विनेशसाठी पोस्ट करत म्हटलं की, सत्याचा आणि निश्चयाचा कायम विजय होतो! खूप खूप शुभेच्छा विनेश... या देशाला, आम्हा सगळ्यांना आपला अभिमान आहे. आता गोल्ड मेडलच पाहिजे, असं म्हटलं होतं.




भारतीयांचं सुवर्णस्वप्न भंगलं


विनेश फोगाटने अंतिम सामन्यात धडक देताच भारतीयांना एक अभिमानास्पद क्षण अनुभवता आला. त्यामुळे तिच्या अंतिम फेरीकडे संपूर्ण देश अगदी आस लावून पाहत होता. पण आता तिला केवळ काही ग्रॅमसाठी अपात्र ठरवण्यात आल्याने पुन्हा एकदा विनेशच्या बाजूने संपूर्ण देश उभा राहिलाय. पण आता यावर भारत सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. 


नेमकं काय घडलं?


विनेश फोगाटचे वजन जास्त असल्याचे लक्षात आल्यानंतर मंगळवारी रात्रभर भारतीय पथकाकडून रात्रभर हालचाली सुरु होत्या. मात्र, बुधवारी सकाळी झालेल्या तपासणीवेळी विनेश फोगाटचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. यानंतर विनेश फोगाटकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. आता ऑलिम्पिकसाठी गेलेल्या भारतीय पथकाकडून उर्वरित सामन्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे.                                                                                                


ही बातमी वाचा : 


Vinesh Phogat: विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र; भारताला मोठा धक्का, एका रात्रीत काय घडलं?