Marathi Actress Aarti Solanki On Her Tranformation: छोट्या पडद्यावरच्या विनोदी कार्यक्रमांमधून अभिनेत्री आरती सोळंकी (Aarti Solanki) घराघरांत लोकप्रिय झाली. याशिवाय ती 'बिग बॉस मराठी'मध्ये (Bigg Boss Marathi) देखील झळकली आहे. आरती सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. सामाजिक तसेच मनोरंजन विश्वातील घडामोडींवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आरती नेहमीच स्पष्ट मत मांडताना दिसते. सध्या आरती सोळंकी (Marathi Actress Aarti Solanki) एका मुलाखतीत बोलताना सांगितलेल्या एका धक्कादायक अनुभवामुळे चर्चेत आहे. 

Continues below advertisement

बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) फेम अभिनेत्री आरती सोळंकी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. तिनं तिच्या ट्रान्सफॉर्मेशननं सर्वांना थक्क केलेलं. तिचं फॅट टू फिट पर्यंतचं फिटनेस पाहून सर्वजण तिचं कौतुक करत आहेत. अशातच नवरात्रोत्सवानिमित्त आरतीनं राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना तिनं फॅट टू फिट होण्याचं मनाशी नक्की कधी केलं? हे सांगितलं आणि त्यामागचा एक धक्कादायक घटनाही सांगितली. 

आरती सोळंकी नेमकं काय म्हणाली? 

अभिनेत्री आरती सोळंकीनं बोलताना सांगितलं की, "एका निगेटिव्ह गोष्टीतून कसं पॉझिटिव्ह करता येईल, ते मी घेतलं. एका शूटच्या वेळी काही माझ्या को-आर्टिस्टनी, स्त्रियांनी मला छक्का म्हणून हिणवलेलं. होय... त्यावेळी मला असं वाटलं की, काय यांना अनुभव आला असले, आता मी खरंच सांगते तुम्ही मला छक्का म्हणा, तृतीयपंथी म्हणा किंवा ट्रान्सजेंडर म्हणा... मला काहीच वाटत नाही, उलट मला त्या व्यक्तींचा अभिमान वाटतो. काही माणसं तृतीयपंथी समाजाबद्दल खोटा आदर ठेवतात... त्यांच्याबद्दल आपुलकी पाहिजे, असं पाहिजे आणि तसं पाहिजे... पण प्रत्यक्षात तसं नसतं. खरं तर त्या समाजाबद्दल आजही कुठेतरी द्वेष आहे."

Continues below advertisement

"जर तुम्ही एका मुलीला छक्का म्हणता आणि तेही समोर बोलायची हिंमत तुमच्यात नाही... मी अख्खा दिवस ते शूट केलं, घरी येताना मी खूप कोड्यात पडलेले... मी टॉम बॉय सारखी राहतेय म्हणून असं म्हणाले असतील का? किंवा माझे केस लहान आहेत, की मी अशीच बिनधास्त राहते म्हणून म्हणाले असतील. मी बिनधास्त आहे, वागणं, बोलणंही तसंच आहे, त्यामुळे तुम्ही माझं जेंडर नाही ठरवू शकत. मी दहा लफडी करत नाही, माझे अफेअर्स नाहीत म्हणून तुम्ही नाही ठरवू शकत माझ्याबद्दल... त्यावेळी मी ठरवलं की, आता मी स्वतःला असं बदलवून दाखवणार. ज्या को-आर्टिस्टनी मला हिणवलंय... मला त्यांची वृत्ती खूप खटकली... तेव्हाच मी ठरवलं...", असं आरती सोळंकी म्हणाली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

डेब्यूआधीच व्हावं लागलं बोल्ड, ज्याला जीव लावला, त्यानंच फसवलं; कमनशीबी अभिनेत्रीला आयुष्यात लग्नानंतरही मिळालं नाही सुख