Reena Roy Affair With Shatrughan Sinha: 70 आणि 80 चं दशकात तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेल्या एका अभिनेत्रीनं वैयक्तिक आयुष्यात मात्र खूपच चढ-उतार पाहिलेत. तिनं जेव्हा इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं, तेव्हाच ती एका सुपरस्टारसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण, या प्रेमात तिच्या नशीबी फसवणूकच आली. नंतर लग्न करुन संसार थाटला, पण तिथेही हिला प्रेम मिळालं नाही. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, लग्नानंतर झालेल्या पोटच्या पोरीसाठीही हिला वणवण करावी लागली. घटस्फोटावेळी मुलीची कस्टडी मिळवण्यासाठी या सुपरस्टार हिरोईननं कोर्टाच्या पायऱ्या झिजवल्या. आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत बोलत आहोत, तिचं नाव 'रीना रॉय'. 

Continues below advertisement

रीना रॉयनं तिच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर केली. लोक रीनाला तिच्या नावामुळे हिंदू असल्याचं गृहीत धरत असले तरी, ती मुस्लिम आणि हिंदू दोन्ही धर्मांना मानत होती. त्यासाठी एक कारण होतं, रिनाचं खरं नाव सायरा अली होतं. खरं तर, तिचे वडील मुस्लिम होते आणि तिची आई शारदा सिन्हा हिंदू होती. रीना रॉयचे पालक लहान असतानाच वेगळे झाले. या निर्णयानंतर, तिन्ही मुलं त्यांच्या आईकडेच राहिली आणि तिच्या आईनं तिच्या मुलीचं नाव 'सायरा अली' वरून 'रूपा रॉय' असं बदलले.

पालकांचा झालेला घटस्फोट 

आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर, रीना रॉयच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. परिणामी, तिनं छोट्या भूमिका करायला सुरुवात केली. तिच्या आईनंही चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या होत्या. निर्माते बी.आर. इशारा यांनी त्यांच्या चित्रपटात रीनाला कास्ट केलं, पण पहिला चित्रपट फारसा गाजला नाही. त्यानंतर, त्याच निर्मात्यानं रिनाला 'जरूरत' (1972) मध्ये आणखी एक संधी दिली.

Continues below advertisement

पदार्पणातच केले बोल्ड सीन

रीना रॉयसाठी तिचा डेब्यू वाटतो तितका सोपा कधीच नव्हता.  ही भूमिका लहान होती आणि बोल्ड सीन्सनी भरलेली होती. दरम्यान, अभिनेत्रीच्या स्वतःच्या गरजा आणि जबाबदाऱ्या होत्या, म्हणून तिनं ही तात्काळ भूमिका स्वीकारली. या चित्रपटानंतर रीनानं पुन्हा एकदा तिचं नाव बदललं. यावेळी, रूपा रॉय वरून रीना रॉय असं केलं. बीआर इशारा यांनी तिला पुन्हा शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत त्यांचा पुढचा चित्रपट 'मिलाप'मध्ये कास्ट केलं. दरम्यान, रीनाचे दोन्ही चित्रपट फ्लॉप झाले.

कसं मिळालं रिना रॉयला फेम 

1976 मध्ये रीना रॉय यांच्या कारकिर्दीला एक वेगळे वळण मिळाले, जेव्हा त्यांना 'नागिन' आणि 'कालीचरण' या चित्रपटांमध्ये भूमिका मिळाल्या. दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आणि त्या लोकप्रिय झाल्या. या चित्रपटांनंतर शत्रुघ्न सिन्हाचं नाव रीना रॉयशी जोडलं जाऊ लागलं. त्यांच्या रिलेशनच्या चर्चा उठल्या. झाल्या. ते सलग एकत्र काम करत होते. पण, जेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांनी पूनम चंदीरामणी यांच्याशी लग्न केलं, तेव्हा रिनाचा विश्वासघात झाला.

सुपरस्टारच्या प्रेमात विश्वासघात

रीना रॉयचं शत्रुघ्न सिन्हासोबतचं नातं खूपच सीरिअस होतं. जेव्हा हे नातं संपलं, तेव्हा रीना रॉय दुःखात बुडालेली. यानंतर तिनं 1983 मध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहसिन खानशी लग्न केलं. त्यांना जन्नत (सनम) ही मुलगी झाली. दरम्यान, या लग्नानंतरही रीना रॉयच्या नशीबात खरं प्रेम नव्हतंच. 1990 पर्यंत या लग्नात कटुता येऊ लागली. असं म्हटलं जातं की, बॉलीवूडमध्ये अपयश आल्यानंतर मोहसिन लंडनला जाऊ इच्छित होता, तर रीना भारतात राहून आपलं काम सुरू ठेवू इच्छित होती. या गोष्टी कधी वाढल्या आणि घटस्फोट झाला हे कळलंच नाही.

मुलीची कस्टडी मिळवण्यासाठी झिजवल्या कोर्टाच्या पायऱ्या

घटस्फोटानंतरही रीना रॉयनं प्रचंड वेदना सहन केल्या. तिनं तिच्या मुलीचा ताबा मिळवण्यासाठी न्यायालयातही धाव घेतली. ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत रीना रॉयनं याबद्दल मन मोकळं केलेलं. तिनं खुलासा केला की, तिनं तिच्या मुलीचा ताबा मिळवण्यासाठी बाबा, तांत्रिक-मांत्रिकांच्याही भेटी घेतलेल्या. सर्वोतोपरी प्रयत्न केलेलं.