Aamir Khans Simple Wedding Look: आमिर खानचा (Aamir khan) तिसरा विवाहसोहळा अगदी साध्या पद्धतीने पार पडला. आमिर खानच्या वांद्रे (Bandra) येथील राहत्या घरात त्यांचा विवाह सोहळा पार पडला. आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाची बरीच चर्चा रंगली. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हे लग्न झालं. आमिरने 5 जुलै रोजी आपल्या प्रियजनांच्या उपस्थितीत हे लग्न केलं. गौरी आणि आमिर हे कायमचे आता एक झाले आहेत. सध्या सोशल मीडियात (Gauri Spratt) आमिर खानच्या लूकची बरीच चर्चा रंगली आहे. दोघांनी सिंपल कपडे परिधान केले होते. सिंपल लूकमध्येही दोघं सुंदर दिसत होते. सध्या दोघांच्या लग्नाच्या (Wedding look) लूकची प्रचंड चर्चा होत आहे. पण सध्या आमिरचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये आमिर खानने त्याच्या पायात चांदीची साखळी घातली असल्याचं दिसत आहे.
आपल्या तिसऱ्या लग्नात आमिर खानने ऑफ व्हाईट रंगाचा धोती अन् कुर्ता परिधान केला होता. त्याच्या कुर्त्यावर एक सुंदर ब्राँझ ब्रोचही होता. ब्रोच खूप सुंदर होता. अभिनेत्याने आपला लग्नातील लूक खूप साधा सिंपल ठेवला होता. तर, आमिर खानच्या कुर्त्यासोबत त्याच्या पायात असलेली वस्तू लक्ष वेधून घेत होती. लग्न झाल्यानंतर तो आपल्या पाहुण्यांसाठी घराबाहेर आला. आमिर पाहुण्यांना त्यांच्या गाड्यांपर्यंत सोडायला बाहेर पडला होता. पापाराझींनी त्याला कॅमेऱ्यात कैद केलं. यावेळी आमिर खानच्या पायाकडे सर्वांचेच लक्ष गेलं. त्याच्या पायात एक जाड चांदीची साखळी दिसली.
आमिर अन् गौरीचा लग्नातील लूक सोशल मीडियात व्हायरल (Aamir Khan Marries Gauri Spratt)
आमिर खानने घातलेल्या चांदीच्या साखळीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. पण आमिर खानने त्याच्या पायात नेमकं घातलं होतं? हे अद्याप कुणालाही ठाऊक नाही. सध्या त्यानं घातलेल्या साखळीची प्रचंड चर्चा होत आहे. दरम्यान, आमिरची बायको गौरी स्प्रॅटने लग्नात खास लेहेंगा परिधान केला होता. तिने हेवी नेकलेस घातला होता. न्यूड मेकअपमध्ये अभिनेत्री सुरेख दिसत होती. तिने केसांत फ्रेश फुले माळली होती. यामुळे गौरीचं लूक अधिक खुललं होतं.
आमिरच्या लग्नातील फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या लग्न सोहळ्यात दिग्गज मंडळी उपस्थित होते. या लग्नात आमिरची तीन मुलेही उपस्थित होते. जुनैद, इरा आणि आझाद यांचे लग्नातील फोटो आणि व्हिडीओही समोर आले आहेत. इंडस्ट्रीतील काही दिग्गज मंडळींनी या लग्नात उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवली. आमिर आणि गौरी या दोघांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियात रंगली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
फेमस 'ऑल द बेस्ट' नाटकातही तुकाराम मुंढेंचा प्रभाव; चायनीजची गाडी अन् नाव ऐकताच प्रेक्षकांचा जल्लोष
