Namrata Sambherao : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao) ही लवकरच 'नाच गं घुमा' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात नम्रता ही अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) हिच्यासोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अनेक कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली नम्रता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यातच आता तिच्या नव्या सिनेमाची देखील प्रेक्षकांना बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. 


नम्रताने तिच्या करिअरच्या सुरुवातीला अनेक छोट्या भूमिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली. पण एका मुलाखतीदरम्यान नम्रताने तिच्या आयुष्यातला एक स्पेशल किस्सा सांगितला आहे. एका ऑडीशनसाठी आमिर खान प्रोडक्शनमधून नम्रताला फोन गेला होता आणि आमिर खानने तिचं नाव सुचवलं होतं, असा खुलासा नम्रताने नुकतच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केल आहे. 


जेव्हा आमिर खान नम्रताचं नाव सुचवतो


नम्रता संभेरावने तिच्या आयुष्यातला हा प्रसंग सांगताना म्हटलं की, 'मला माहितेय आताही माझी जर एखादी इच्छा असेल तर ती काही वर्षांनी नक्की पूर्ण होईल. मध्ये मी एक ऑडीशन दिली होती. त्यामध्ये मी सिलेक्ट होईल की नाही हे मला माहित नाही.पण मी तिथपर्यंत पोहचले हेच माझ्यासाठी खूप आहे. तेव्हा मला आमिर खान प्रोडक्शनमधून फोन आला की, ऑडीशन आहे, सिनेमाचं ऑडीशन  आहे. पण नंतर मला त्यांच्याच टीमकडून कळालं की, आमिर खान सरांनीच माझं नाव सजेस्ट केलंय.'


आमिर खान हास्यजत्रेचं फॅन


पुढे तिने म्हटलं की, 'त्यात असं झालं की, त्यांना माझा कॉन्टॅक्ट कुठूनच मिळत नव्हता. इन्स्टाग्रामवर मला मेसेज आला होता आणि तो रिक्वेस्टमध्ये गेला होता. मी अचानक एकदा रिक्वेस्टमध्ये पाहिलं, की असं असं ते माझा कॉन्टॅक्ट नंबर शोधत आहेत आणि तो त्यांना मिळत आहे. त्यांना तो अर्जंट हवा होता. जेव्हा मला त्या प्रोडक्शनमधून फोन आला तेव्हा त्यांनी मला म्हटलं की, 20 दिवस झाले आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. आमिर खान सरांनी तुमचं नाव सजेस्ट केलंय. त्यामुळे आम्ही तुम्हाला शोधत होतो. ते हिंदी प्रोडक्शन असल्यामुळे कदाचित त्यांना माझा कॉन्टॅक्ट मिळाला नसेल. नंतर मी जरा चौकशी केल्यानंतर कळलं की, ते हास्यजत्रेचे फॅन आहेत, त्यांना काम आवडतं. मुख्य खलनायिकेसाठी त्यांनी माझं नाव सजेस्ट केलं होतं. त्याची मी ऑडीशन तर दिली आहे, त्याचं आता पुढे काय होईल हे मलाही नाही माहित. पण ते फार भारी होतं.' 


ही बातमी वाचा : 


Jui Gadkari : जुई गडकरीला जेलमध्ये टाकण्याची धमकी, पोस्ट शेअर करत दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली, 'येच तू बघते तुला'