Jui Gadkari Threat Message : 'ठरलं तर मग' या मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी (Jui Gadkari). जुई मागील अनेक काळापासून बरीच चर्चेत आहे. त्यातच नुकतच जुईने केलेल्या तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही काही खुलासे केले होते. त्यातच आता पुन्हा एकदा जुई चांगलीच चर्चेत आली आहे. जुईला नुकतच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या या पोस्टची जोरदार चर्चा सुरु आहे. 

जुईला तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये संबंधित व्यक्तीने तिला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली आहे. यावर जुईने देखील जशास तसं उत्तर दिल्याचं पाहायला मिळतंय. सध्या जुईची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतंय. 

जुईला आली तुरुंगात टाकण्याची धमकी

सेलिब्रेटी म्हणून अनेकांचे मेसेज सोशल मीडियावर येत असतात. असाच एक मेसेज अभिनेत्री जुई गडकरी हिला देखील आलाय. पण या मेसेजमध्ये तिला चक्क तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आलीये. त्या तरुणीने जुईला मेसेज करुन म्हटलंय की, 'काय गं तुला खूप माज आलाय का? आम्ही तुला फॉलो करायचं आणि तुला आम्हाला फॉलो करायला काय झालं? आताच्या आता आम्हाला फॉलो करायचं. तू फॉलो कर नाहीतर तुला जेल मध्ये टाकेन. आजपर्यंत तू आमची आवडती होतीस कारण, आम्हाला वाटलं तू फॉलो करशील. पण, तू फॉलो केलं नाहीस आता तुला पोलिसात टाकेन…मी उद्याच्या उद्या तुझ्या गावाला येते कर्जतला समजलं कुठेही पळायचं नाही.'

जुईने दिलं जशास तसं उत्तर

जुईने या मेसेजचा स्क्रिनशॉट तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन शेअर केला आहे. यामध्ये त्या संबंधित तरुणीला टॅग करत जुईने म्हटलं की, आता झालीस तू फेमस.येच तू कर्जतला बघतेच मी पण.  हे अजिबात सहन केलं जाणार नाही. थेट पोलीस स्टेशनला भेटू मग आपण.

 

ही बातमी वाचा : 

Sankarshan Karhade : कविता ऐकून राज ठाकरेंनी संकर्षणला थेट शिवतीर्थवर बोलावून घेतलं अन् बाहेर पडताना म्हणाले, 'घरच्यांना सांगा सुखरुप..'