8 cricketers were seen in this one film : 'मुझसे शादी करोगी’ या चित्रपटाला 21 वर्ष पूर्ण झाली आहेत, यावर लेखक अनीस बज्मी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. डेविड धवन यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटाची कथा अनीस बज्मी यांनी लिहिली होती. या चित्रपटात सलमान खान, प्रियंका चोप्रा, अमरीश पुरी आणि अक्षय कुमार प्रमुख भूमिकांमध्ये झळकले होते. कमाईच्या बाबतीतही 'मुझसे शादी करोगी'ने 15 कोटींच्या बजेटमध्ये 56 कोटींचा गल्ला जमवला होता. पण तुम्हाला माहिती आहे का, या चित्रपटात 8 क्रिकेटपटूही दिसले होते?
IMDb नुसार, या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये कपिल देव, नवजोत सिंह सिद्धू, इरफान पठाण, मोहम्मद कैफ, पार्थिव पटेल, हरभजन सिंह, जवागल श्रीनाथ आणि आशीष नेहरा हे क्रिकेटपटू झळकले होते. चित्रपटाची कथा अशी होती की सलमान खानचा पात्र खूपच रागीट असतं, त्यामुळे त्याच्या आयुष्यात गडबड सुरु असते. पण नंतर त्याला प्रियंका चोप्राच्या पात्रावर प्रेम होतं. मात्र मग मध्ये अक्षय कुमार येतो. या कॉमेडी चित्रपटाच्या शेवटी भारतीय क्रिकेटपटू एक मोठा ट्विस्ट आणतात.
चित्रपटाचे लेखक आणि निर्माता अनीस बज्मी यांनी ‘मुझसे शादी करोगी’च्या 21 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली असून, त्यांनी लिहिलं की, आजही हा चित्रपट पाहताना चेहऱ्यावर हसू येतं. त्यांनी या खास क्षणाची आठवण करताना या चित्रपटाची लोकप्रियता ही प्रेक्षकांच्या प्रेमामुळे असल्याचं म्हटलं आहे.
अनीस बज्मी यांनी आपल्या इंस्टाग्रामवर चित्रपटाचा पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं,"‘मुझसे शादी करोगी’चे 21 वर्ष – हा चित्रपट आजही हास्य आणि थोडंसं वेडं पण घेऊन येतो. प्रेक्षकांच्या प्रेमासाठी मी मनापासून आभारी आहे." शेअर केलेल्या पोस्टरमध्ये सलमान, प्रियंका आणि अक्षय हे तिघंही कलाकार दिसत आहेत. आज 21 वर्षांनंतरही हा चित्रपट तितकाच लोकप्रिय आहे.
30 जुलै 2004 रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट साजिद नाडियाडवाला यांनी निर्मिती केला होता. या चित्रपटात सलमान खान, प्रियंका चोप्रा, अक्षय कुमार, अमरीश पुरी, कादर खान, सतीश शहा आणि राजपाल यादव हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये होते. गोव्याच्या सुंदर पार्श्वभूमीवर चित्रीत झालेली ही कथा हॉलिवूड चित्रपट ‘Anger Management’ वर आधारित होती.
‘मुझसे शादी करोगी’ ही 2004 मधील चौथी सर्वाधिक कमाई करणारी भारतीय फिल्म होती. या चित्रपटाला तीन फिल्मफेअर पुरस्कार नामांकनं मिळाली आणि सहाव्या आयफा पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सलमानसाठी सर्वोत्तम अभिनेता, प्रियंकासाठी सर्वोत्तम अभिनेत्री आणि डेविड धवनसाठी सर्वोत्तम दिग्दर्शक अशा अनेक श्रेणींमध्ये पुरस्कार मिळाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या