Ramdas Kadam : मुंबईतील सावली बार (Savli Bar Mumbai) प्रकरणामुळे राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांची अडचण वाढली असताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी काही खळबळजनक आरोप करत धक्कादायक माहिती दिलीय. वाशीमध्ये योगेश कदम यांनी बारवरील केलेल्या कारवाईनंतर काही पोलिस अधिकाऱ्यांचे कारवाई न करण्यासंदर्भात फोन आले. पण योगेश ऐकला नाही. त्यामुळेच योगेशची बदनामी करण्यासाठी सावली प्रकरण जाणीवपूर्वक केल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. म्हणजेच लेडीज बार बंद न करण्यासाठी पोलिसांचाच चक्क गृहराज्यमंत्र्यांवर दबाव असल्याचे पुढे आलं आहे.
अर्धवट वकील अनिल परब हेतुपुरस्सर बदनामी करताय- रामदास कदम
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्याच नावावर मुंबईमध्ये सावली बार आहे. या बारवरून अत्यंत गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी केले आहेत. पण तेव्हापासून अनिल परब आणि रामदास कदम यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. अशातच आज रामदास कदम यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषद करत काही खळबळजनक आरोप केले आहेत. सावली बारच्या बाबतीत अर्धवट वकील अनिल परब हेतुपुरस्सर बदनामी करत आहेत. शिवाय ते राजीनामा मागणारे कोण? असेहि रामदास कदम म्हणाले. यावेळी त्यांनी ऍग्रिमेंट दाखवत काही खुलासे केलेत. तर शरद शेट्टींना हे हॉटेल चालवायला दिलं होतं. यात कॉलम 6 मध्ये असं म्हटलं आहे की, कोणताही बेकायदेशीर धंदा चालवणार नाही. हॉटेल धंदा चालवेने हे अटींचं भंग होणारे नाही. तर कॉलम 7 मध्ये म्हटलं आहे की, काही कृत्य झाल्यास धंदा चालवणारे जबाबदार असतील, मालकाची जबाबदारी राहणार नाही. कलम 6 आणि 7 मध्ये स्पष्ट म्हटलं आहे. अन्य गोष्टी आढळल्याने आम्ही तात्काळ त्याला बाहेर काढलं, दोन्ही लायसन्स तेव्हाच जमा केले आहेत. असेही ते म्हणाले.
राजीनाम्याचा विषयच येत नाही- रामदास कदम
दरम्यान, लायसन्स 13 तारखेला जमा केले आहेत आणि अनिल परब यांनी 18 ला विधिमंडळात विषय काढला. या हॉटेलचा आणि गृहराज्यमंत्री यांचा काहीही संबंध नाही. शिवाय राजीनाम्याचा विषयच येत नाही. हे महाशय दिशाभूल करताहेत, आम्ही लायसन्स पहिलेच जमा केलेले आहेत. नियमबाह्य यांनी हे विधानमंडळात हे विषय काढले आहेत. हे आरोप तात्काळ काढून टाकावेत, आम्ही सभापतींना अर्ज दिलेला आहे. असेही रामदास कदम म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या