पिंपल आल्यानंतर त्या जागेवर सकाळचा थुका लावते, अभिनेत्री तमन्ना भाटियाने सांगितलं स्किन केअर रुटीन
Tamannaah Bhatia reveals her skin care routine : अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने तिचं स्किन केअर रुटीन सांगितलं आहे. एका मुलाखतीत तिने याबाबत सविस्तर भाष्य केलंय.
Tamannaah Bhatia reveals her skin care routine
1/9
सध्याच्या जगात प्रत्येक अभिनेत्रीला सुंदर दिसायचं असतं. पापाराझी अभिनेत्रींचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी कुठेही हजर झालेले असतात. कधी ती विमानतळावर पोहोचतात. कधी ते सेलिब्रिटींच्या जीम जवळ जातात. तर घराजवळ गेलेले पाहायला मिळतात. त्यामुळे अभिनेत्रींना नेहमी सुंदर दिसावं, असं वाटत असतं.
2/9
अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. आपल्या अभिनयासोबतच तिच्या ग्लोइंग स्किनसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, तिच्या सुंदर त्वचेचं गुपित ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. लल्लनटॉपला दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या स्कीन केअर रुटीनबाबत भाष्य केलंय.
3/9
अभिनेत्री तमन्ना भाटीया म्हणाली, माझ्या कुत्र्याला फिरवून आणणारा माणूस एकदा माझ्या घरी आला होता. त्यावेळी माझ्या चेहऱ्यावर मेकअप वगैरे नव्हता आणि चेहऱ्यावर मोठा पिंपल आला होता. त्याने मला विचारलं, तुम्हा लोकांना पण पिंपल येतो. मी त्याला म्हटलं हो नक्कीच येतो. खूप सारे येतात...आम्ही पण सर्वांप्रमाणेच माणूस आहोत.
4/9
दरम्यान, यावेळी तमन्ना भाटीयाला पिंपल घालवण्यासाठी काय करते असं विचारण्यात आलं असता ती म्हणाली, पिंपल आल्यानंतर त्या जागेवर सकाळी थुका लावते. हो ते काम करतं. पण तो सकाळचा थुका असायला हवा. आपण दात घासण्यापूर्वीचा थुका असायला हवा.
5/9
पुढे बोलताना तमन्ना भाटिया म्हणाली, मी डॉक्टर नाही, पण स्वत:चा अनुभव सांगत आहे. तुम्ही सकाळी उठलेले असता त्यावेळी तुमच्या तोंडात अँटी बॅक्टीरियल एलिमेंट्स तयार झालेले असतात.
6/9
लोक अनेक स्किन केअर ब्रँड प्रमोट करत असतात. तुम्हाला अँटी एजिंग वयाच्या 25 व्या वर्षापासून घेण्यास सुरुवात केली पाहिजे. हे फक्त मार्केटिंग नाही, ही खरी गोष्ट आहे.
7/9
मी सातत्याने कॅमेऱ्यासमोर राहिली आहे, त्यामुळे मी वयाच्या 24-25 व्या वर्षापासून मी स्किन केअर फॉलो करते. याशिवाय चांगला डाएट देखील केला पाहिजे. बऱ्याच लोकांना काही गोष्टींची अॅलर्जी असते. पण त्यांना माहिती नसते. पहिल्यांदा तुम्हाला तुमचं शरीर समजून घ्यायची गरज असते. तुमची इंटरनल हेल्थ चांगली असेल तर तुमची स्कीन देखील चांगली राहाते.
8/9
याशिवाय तुमचे इमोशन आणि तुमची झोप देखील तुमच्या स्कीनवर परिणाम करते. तुम्ही जर खूश असला तर ते देखील तुमच्या चेहऱ्यावर दिसतं.
9/9
त्यामुळे खूश राहण्यासाठी तुम्हाला तुमचा मेंदूच्या विचार करण्याच्या प्रोसेसवर देखील कंट्रोल ठेवायला हवा.
Published at : 03 Aug 2025 04:48 PM (IST)