64 Packed Suitcases At Rajesh Khanna Bungalow After His Death: भारतीय सिनेसृष्टीचा पहिला सुपरस्टार (Bollywood First Superstar) अभिनेता म्हणजे, राजेश खन्ना (Rajesh Khanna). त्यांच्या स्टारडमची ख्याती, आजही इंडस्ट्रीत चर्चेत असते. आजवर दुसऱ्या कुणा अभिनेत्याला तसं स्टारडम मिळवचा आलेलं नाही. स्टारडमसोबतच राजेश खन्ना आपल्या आलिशान लाईफस्टाईलसाठीही ओळखले जात होते. असं सांगितलं जातं की, काका म्हणून प्रसिद्ध असलेले राजेश खन्ना यांच्या आयुष्यावर गौतम चिंतामणी यांनी लिहिलेलं पुस्तक Dark Star: The Loneliness of Being Rajesh Khanna मध्ये याचं वर्णन करण्यात आलं आहे. 

Continues below advertisement


या पुस्तकात असंही नमूद केलंय की, राजेश खन्ना हे एक रहस्यमय व्यक्तिमत्व होतं, ज्यांनी आयुष्यभर स्टारडमचा आनंद घेतला. कालांतरानं त्यांच्या कारकिर्दीला काहीसं ग्रहण लागलं, काहीशी घसरण झाली, पण तरीही राजेश खन्ना यांनी त्यांची लग्झरी लाईफस्टाईल सोडली नाही. शेवटपर्यंत त्यांनी स्वतःचे शौक पूर्ण केले. 


राजेश खन्ना यांच्या मृत्यूनंतर घरातून सापडलेल्या 64 सुटकेस 


पुस्तकात असं नमूद करण्यात आलं आहे की, जेव्हा राजेश खन्ना परदेश दौऱ्यावर जायचे, तेव्हा ते खूप पैसे खर्च करायचे. त्यातून ते त्यांच्या ओळखीच्यांसाठी भेटवस्तू खरेदी करायचे आणि नंतर त्या त्यांना द्यायलाच विसरून जायचे. गौतम चिंतामणी यांनी पुस्तकात नमूद केलं आहे की, 2012 मध्ये राजेश खन्ना यांच्या निधनानंतर त्यांच्या बंगल्यातून किमान 64 सुटकेस सापडल्या होत्या, ज्या पूर्णपणे भरलेल्या होत्या. त्या सुटकेसमध्ये त्यांनी त्यांच्या परदेश दौऱ्यांमधून खरेदी केलेल्या भेटवस्तू होत्या, पण ज्यांच्यासाठी त्यांनी त्या खरेदी केल्या होत्या त्यांना ते देऊ शकले नाहीत.


पुस्तकात लिहिलंय की, "जेव्हाही राजेश खन्ना परदेशवारी करुन परतायचे, त्यावेळी ते खूप गिफ्ट्स खरेदी करून घेऊन यायचे. कधीकधी ते त्यांना गिफ्ट्स द्यायला विसरुन जायचे. कधीकधी तर घरी परतल्यावर त्या गिफ्टचा त्यांना विसर पडायचा... त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा बंगला 'आशीर्वाद'मध्ये महागड्या गिफ्ट्सनी भरलेल्या तब्बल 64 सुटकेस सापडलेल्या, हे ऐकून अनेकांना धक्का बसलेला. सर्वात आधी या सूटकेसबाबत मोठं गूढ वाढलेलं. पण, कालांतरानं त्या 64 सुटकेसचं रहस्य उलगडलं.                       


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Salman Khan Stalked Bollywood Actress On Morning Walk: ऐश्वर्या, कतरिना सगळ्या नंतर, कधीकाळी 'ही' अभिनेत्री होती भाईजानच्या दिलाची धडकन; सायकलनं करायचा पाठलाग