2012 Erotic Thriller Film: सध्या ओटीटी (OTT Released) आल्यामुळे आपल्याला हवं तेव्हा, हवी ती फिल्म आपण पाहू शकतो. सध्या क्राइम (Crime Movie), थ्रीलर सीरिजच्या (Thriller Series) शोधात प्रत्येकजण असतो. तुम्हीही अशाच एखाद्या सीरिजच्या शोधात असाल तर, आज आम्ही तुम्हाला एका अशाच सीरिजबाबत सांगणार आहोत. एक चित्रपट 13 वर्षांपूर्वी बॉक्स ऑफिसवर (Box Office) प्रदर्शित झालेला. या सिनेमानं त्यावेळी बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुमाकूळ घातलेला. 'द काश्मीर फाइल्स' सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. ही फिल्म इरोटिक थ्रिलर फिल्म होती. जिची खूपच चर्चा रंगलेली.
या फिल्ममध्ये एक महिला पत्रकार तिच्या मैत्रिणीसोबत स्टिंग ऑपरेशन करते. तिला एका बड्या आणि मोठं प्रस्त असलेल्या व्यावसायिकाचा पर्दाफाश करायचा असतो. पण, त्या व्यावसायिकाला याबाबत माहिती मिळते, त्यावेळी तो बदला घेण्यासाठी महिला पत्रकाराविरुद्ध असा सापळा रचतो की, तिचं आयुष्य उद्ध्वस्त होतं.
फिल्मची कथा काय?
आम्ही ज्या सिनेमाबाबत सांगतोय, त्याचं नाव जिद (Zid (2014) आहे. या सिनेमाची कथा विक्रम भट्ट यांनी लिहिली आहे. निखिल द्विवेदी, गुलशन देवैया, पाओली दाम, मोहन कपूर आणि जॉय सेनगुप्ता यांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. कथा महिला पत्रकार काव्या कृष्णा (पाओली दाम) आणि तिचा मित्र विकी (निखिल द्विवेदी) पासून सुरू होते, जी सिमेंटिक कंपनीच्या मालक आणि बडा व्यावसायिक सिद्धार्थ धनराजगीर (गुलशन देवैया) यांच्यावर स्टिंग ऑपरेशन करते.
या चित्रपटाची कथा विक्रम भट्ट यांनी लिहिली आहे. निखिल द्विवेदी, गुलशन देवैया, पाओली दाम, मोहन कपूर आणि जॉय सेनगुप्ता यांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. कथा महिला पत्रकार काव्या कृष्णा (पाओली दाम) आणि तिचा मित्र विकी (निखिल द्विवेदी) पासून सुरू होते, जी सिमेंटिक कंपनीच्या मालक आणि वेडा व्यावसायिक सिद्धार्थ धनराजगीर (गुलशन देवैया) यांच्यावर स्टिंग ऑपरेशन करते. या स्टिंग ऑपरेशनचा बदला घेण्यासाठी सिद्धार्थ काव्याला त्याच्या कंपनीत तीनशे टक्के पगारवाढ देऊन नोकरी देतो. या काळात, दोघेही प्रेमात पडतात आणि नंतर परदेश दौऱ्यावर जातात आणि तिथे ते एकमेकांच्या खूपच जवळ येतात.
बदला घेण्यासाठी वैश्या बनलेली अभिनेत्री...
दुसऱ्या दिवशी काव्या ऑफिसमध्ये पोहोचते, तेव्हा तिला तिथून हाकलून लावलं जातं आणि सिद्धार्थ तिला सांगतो की, त्यानं स्टिंग ऑपरेशनचा बदला घेण्यासाठी प्रेमात पडल्याचं नाटक केलं होतं. काव्याला धक्का बसतो, ती खूप खचते आणि मग तिचा मित्र विकी तिला डॉक्टरकडे घेऊन जातो, जिथे तिला दिवस गेले असून ती सिद्धार्थच्या मुलाची आई होणार असल्याचं कळतं. काव्या सिद्धार्थला हे सांगते. सिद्धार्थ माफी मागण्याचं नाटक करतो आणि काव्याचं अपहरण करतो आणि नंतर काव्याचा गर्भपात देखील करतो. यानंतर, सिद्धार्थपासून बदला घेण्यासाठी, काव्या वेश्या बनते आणि त्याच्याच कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांशी संबंध ठेवते आणि कंपनीची माहिती लीक करते. यासाठी, काव्या कॅबिनेट मंत्री के. मल्होत्रा (मोहन कपूर) सोबत देखील संबंध ठेवते आणि त्यांच्या मदतीनं सिद्धार्थची कंपनी उध्वस्त करते. शेवटी, काव्याचा मृत्यू होतो. कुणीतरी काव्याला गोळ्या घातलं, पण ते नेमकं कोण? हे जाणून घेण्यासाठी सिनेमा नक्की पाहा.
दरम्यान, 9 कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने 16.43 कोटींचा गल्ला जमवला होता. चित्रपटाचा दुसरा भाग 2014 मध्ये, तिसरा भाग 2015 मध्ये आणि चौथा भाग 2018 मध्ये प्रदर्शित झालेला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :