मुंबई : संपूर्ण राज्यात आत विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024 Voting) मतदानाची प्रक्रिया चालू झाली आहे. या निवडणुकीत कोणताही नागरिक मतदानापासून वंचित राहू नये म्हणून गेल्या कित्येक दिवसांपासून निवडणूक आयोगाची तयारी चालू आहे. आयोगाने राज्यभरात ठिकठिकाणी मतदान केंद्रे उभारली आहेत. तसेच मतदानासाठी जनजागृतीही केलेली आहे. आज सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. दरम्यान अनेक नागरिकांकडे मतदान कार्ड सापडत नाही किंवा ऐनवेळी ते गहाळ होते. त्यामुळे आणखी कोणकोणत्या कागदपत्रांच्या मदतीने तुम्ही मतदान करू शकता? हे जाणून घेऊ या...


मतदानाची प्रक्रिया कशी पार पडणार? 


आज म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी राज्यभरात मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी सात वाजेपासून मतदान चालू होणार आहे. राज्यातील प्रत्येक पात्र नागरिकाला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येईल. नागरिकांनी जवळच्या मतदान केंद्रात जाऊन मतदान करावयाचे आहे. 


कोणकोणत्या कागदपत्रांसह मतदान करता येईल? 


मतदान करण्यासाठी मतदान कार्ड हे प्रमुख कागदपत्र आहे. ज्या नागरिकांकडे हे कागदपत्र असेल, त्यांना मतदान करता येईल. मात्र हे कागदपत्र नसेल तर निवडणूक आयोगने मतदानासाठी इतरही काही कागदपत्रांना परवानगी दिली आहे. तुमच्याकडे एकूण 12 कागदपत्रांपैकी कोणतेही एक कागदपत्र असेल, तर तुम्हाला मतदान करता येईल. तुमच्याकडे मतदानकार्ड नसेल आणि तुमचे मतदार यादीत नाव असेल तर खालील कागदपत्रांच्या मदतीने तुम्ही मतदान करू शकता. 


1. पासपोर्ट


2. आधार कार्ड


3. पॅन कार्ड


4. ड्रायव्हिंग लायसन्स


5. मनरेगा कार्ड


6. केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचं आयडी कार्ड


7. फोटो असलेलं पेन्शन कार्ड


हेही वाचा :


Maharashtra Assembly Election 2024 Live Updates : हाय प्रोफाईल परिसर मलबार परिसरामध्येही मतदानाची जय्यत तयारी


Maharashtra Election : राज्यातील 288 मतदारसंघांतील 4136 उमेदवारांचे भवितव्य होणार पेटीत बंद; मतदानाची वेळ कधीपर्यंत? 


Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वसई-विरारमध्ये गुजरातच्या 100 ते 150 बस संशयाच्या भोवऱ्यात; मतदानाच्या काही तासांआधी काय घडलं?