West Bengal Exit Poll Result 2021 Date Time: पश्चिम बंगालमध्ये सत्तेची अंतिम लढाई सुरू आहे. आज संध्याकाळी आठव्या टप्प्यातील मतदान संपताच बंगालची सत्ता कोण घेणार हे निश्चित होईल. सत्तारूढ तृणमूल काँग्रेस परत येईल की राज्यात खुर्ची मिळविण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी होईल. निवडणुकीचा निकाल 2 मे रोजी येणार आहे. परंतु, एबीपी न्यूजवरील एक्झिट पोलच्या माध्यमातून तुम्हाला बंगालच्या मनात काय आहे? याचा अचूक अंदाज तुम्हाला कळू शकेल.
सायंकाळी पाच वाजल्यापासून पश्चिम बंगालच्या एक्झिट पोल
आज सायंकाळी पाच वाजल्यापासून एबीपी न्यूजवर पश्चिम बंगालचा एक्झिट पोल सर्वांना पाहायला मिळणार आहे. 2 मे रोजी येणाऱ्या निवडणुकांच्या निकालाआधी आपणास ठाऊक असेल की सत्तेच्या सिंहासनावर कोण बसणार आहे. सायंकाळी 5 वाजेपासून तुम्हाला मतदारांचा मूड जाणून घेता येईल.
पश्चिम बंगालमधील जागा
पश्चिम बंगालमध्ये 4 टप्प्यांत 294 विधानसभा जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या आणि आठव्या टप्प्यातील निवडणुका आज सुरू आहेत. बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 27 मार्च रोजी झाले आणि त्यानंतर एप्रिल 1, 6, 10, 17, 22 आणि 26 एप्रिल रोजी मतदान झाले.
पक्षांकडून प्रतिष्ठा पणाला
बंगालची लढाई जिंकण्यासाठी भाजप आणि टीएमसीने सर्व ताकद पणाला लावली आहे. देशात कोरोना विषाणूचा धोका असूनही बंगालमध्ये जाहीर सभा, रॅलींना उत आला होता. भाजपकडून पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहापासून अनेक मातब्बर नेत्यांनी जोर लावला आहे. त्याचवेळी टीएमसी चीफ आणि बंगालच्या सीएम ममता बॅनर्जी यांनीही पायाच्या दुखापतीनंतरही जोरदार प्रचार केला. निवडणुकांचे शेवटचे दोन टप्पे जवळ येताच कोविडच्या ढासळत्या स्थितीमुळे निवडणूक प्रचार ठप्प झाला. आता प्रत्येकजण 2 मे रोजी होणार्या निवडणुकीच्या निकालाची वाट पाहत आहे.
पश्चिम बंगाल निवडणूक
- या वेळी बंगालमध्ये टीएमसी प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक प्रचारात 44 दिवस व्हीलचेअरवर प्रचार करत होत्या.
- पंतप्रधान मोदींनी बंगालमध्ये सुमारे 20 जाहीर सभा घेतल्या आणि अमित शहा यांनी सुमारे 70 रॅली काढल्या.
- टीएमसी उमेदवाराच्या समर्थनार्थ ममता बॅनर्जी यांनी सुमारे 150 जाहीर सभांना संबोधित केले.
- ममता बॅनर्जी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी केंद्राला जबाबदार धरताना दिसल्या. म्हणून त्यांनी असेही आश्वासन दिले की टीएमसी सरकार आल्यास बंगालच्या लोकांना विनामूल्य लसीकरण केले जाईल.
- राहुल-ममता नंतर पंतप्रधान मोदींनीही सर्व सभा रद्द केल्या आणि भाजपने सभेसाठी फक्त 500 लोकांची संख्या मर्यादित केली.
ममता यांच्या बाजूचे आणि विरोधातील मुद्दे
- निवडणूक प्रचारादरम्यान ममता नंदीग्रामच्या लोकांसोबत भावनिक संबंध बनवण्यात यशस्वी ठरल्या आहेत.
- त्यांनी 2007 मध्ये झालेल्या आंदोलनाला शेतकरी आंदोलनाशी जोडलं.
- पीरजादा अब्बासी यांच्या नेतृत्वाखालील इंडियन सेक्युलर फ्रंटने नंदीग्रामध्ये उमेदवार उभा केलेला नाही. त्यामुळे मुसलमान मतं फुटण्याची भीती जास्त नाही.
- तर, ममता यांनी हिंदू बहुल परिसरातील मंदिरांमध्ये जाऊन त्या हिंदूविरोधी नाहीत असा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला आहे. पण, नोकरी आणि विकास यांसारखे मुद्दे ममता यांच्या विरोधात आहेत.
मुख्य उमेदवार कोण आहेत?
भाजपने आतापर्यंत पाच खासदारांना तिकिटे दिली आहेत.
केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो – टोलीगंज मतदारसंघ
हुगळीचे खासदार लॉकेट चॅटर्जी – चुंचुडा मतदारसंघ
कूचबिहारचे खासदार निसिथ प्रामणिक – दिनहाटा मतदारसंघ
राज्यसभेचे सदस्य स्वपन दासगुप्ता – तारकेश्वर मतदारसंघ
खासदार जगन्नाथ सरकार – रानाघाट मतदारसंघ
मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसमोर त्यांचे एकेकाळचे सर्वात विश्वासू शुभेंदू अधिकारी यांचं आव्हान आहे. नंदीग्राममध्ये ही लढत झाली.
याशिवाय मुकुल रॉय (कृष्णानगर उत्तर), त्यांचे पुत्र शुभ्रांशु रॉय (बीजपुर) आणि राहुल सिन्हा (हाबडा) यांनाही भाजपने तिकिट दिले आहे.
भाजपचे 'स्टार' उमेदवार
अभिनेत्री पायल सरकार - बेहाला पूर्व मतदारसंघातून तिकिट
अभिनेत्री तनुश्री चक्रवर्ती - हावडा श्यामपूरमध्ये निवडणूक रिंगणात
अभिनेता यशदास गुप्ता - चंडीतलामधून विधानसभेचं तिकिट
अभिनेता हीरन चटर्जी - खडगपूरमध्ये भाजपचे उमेदवार
अभिनेत्री अंजना बसु
टीएमसीचे 'स्टार' उमेदवार
अभिनेत्री - कौशानी मुखर्जी - कृष्णानगर उत्तर मतदारसंघातून तिकिट
गायिका अदिति मुंशी - राजरहाट गोपालपूरमध्ये निवडणूक रिंगणात
अभिनेत्री लवली मित्रा - सोनारपूर दक्षिणमधून उमेदवारी
अभिनेत्री बीरबाहा हांसदा - झारग्रामधून निवडणूक रिंगणात
अभिनेत्री सयंतिका बनर्जी - आज त्यांना बांकुडामधून उमेदवारी जाहीर
अभिनेत्री साउनी घोष - त्यांना आसनसोल दक्षिणमधून तिकिट
अभिनेत्री जून मालिया - मेदिनीपूरमधून त्यांना उमेदवारी
कुठं कुठं पाहू शकता एक्सिट पोल
लाईव्ह टीव्ही: https://marathi.abplive.com//amplive-tv/amp
मराठी वेबसाइट: https://marathi.abplive.com//amp
इंग्रजी वेबसाइट: https://news.abplive.com//amp
YouTube
हिंदी यूट्यूब: https://www.youtube.com/channel/UCmphdqZNmqL72WJ2uyiNw5w
इंग्रजी यूट्यूब: https://www.youtube.com/user/abpnewstv
मराठी युट्युब: https://youtube.com/c/abpmajhatv
हिंदी फेसबुक अकाउंट: facebook.com/abpnews
इंग्रजी फेसबुक अकाउंट: facebook.com/abplive
मराठी फेसबुक अकाउंट: https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर हॅंडल: https://twitter.com/abpmajhatv?s=09
इंस्टाग्राम: https://instagram.com/abpmajhatv?igshid=mddulihsde0q