मुंबई :  पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. या कलांनुसार तृणमूल काँग्रेसने 200 जागांचा टप्पा पार केला आहे. तृणमूल काँग्रेस 208 जागांवर पुढे असून भाजपची आघाडी 80 जागांवर आली आहे. यानुसार राज्यात तृणमूल काँग्रेसची लाट कायम असून पुन्हा ममता बॅनर्जी विजयाची हॅटट्रिक करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील ट्वीट करत पश्चिम बंगाल निवडणुकीतील विजयबद्दल ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे.


शरद पवार आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले,  "पश्चिम बंगाल निवडणुकीतील विजयबद्दल ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन.आता जनतेच्या हितासाठी आणि कोरोनाशी लढण्यासाठी एकत्र काम करुया".



तृणमूल काँग्रेस 208 जागांवर पुढे असून भाजपची आघाडी 80 जागांवर आली आहे. सर्वात दयनीय अवस्था डावे आणि काँग्रेस आघाडीची आहे. कलानुसार त्यांना केवळ एकाच जागेवर आघाडी मिळवता आली. तर अन्य उमेदवारांना दोन जागा मिळाल्या आहेत. अखिलेश यादव  यांनी देखील  भाजपवर निशाणा साधत ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे.


अखिलेश यादव यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, "पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाला पराभूत करणारी जागरुक जनता, लढाऊ ममता बॅनर्जी आणि टीएमसीच्या समर्पित नेते आणि कार्यकर्त्यांचं हार्दिक अभिनंदन. भाजपने एका महिलेवर केलेल्या 'दीदी ओ दीदी' या अपमानजनक टिप्पणीला जनतेने दिलेलं हे सडेतोड उत्तर आहे."


Election Results 2021 LIVE: नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींची मुसंडी, 1500 मतांची आघाडी