Election Results 2021 LIVE: नंदीग्राममध्येही 'ममता राज', अटीतटीच्या लढतीत ममता बॅनर्जी यांचा शुभेन्दु अधिकारी यांच्यावर 1200 मतांनी विजय
Assembly Election Results 2021 Live Updates: निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 2364 केंद्रांवर मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे
पश्चिम बंगालमधील आरामबागेतील भाजप कार्यालयाला आग, तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी आग लावल्याचा भाजपचा आरोप, तृणमूलनं आरोप फेटाळले
भारताचे लक्ष लागून असलेल्या आणि क्षणाक्षणाला काळजाचा ठोका चुकवणाऱ्या नंदीग्रामच्या लढतीत ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या शुभेन्दु अधिकारी यांच्यावर 1200 मतांनी विजय मिळवला आहे. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला बहुमत मिळणार हे आता स्पष्ट झालंय. याबाबत ममता बॅनर्जींनी बंगालच्या जनतेचे आभार मानले. तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल धन्यवाद, पश्चिम बंगालमधील सर्व जनतेचं अभिनंदन, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी सर्व जनतेचे आभार मानले.
भारताचे लक्ष लागून असलेल्या आणि क्षणाक्षणाला काळजाचा ठोका चुकवणाऱ्या नंदीग्रामच्या लढतीत ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या शुभेन्दु अधिकारी यांच्यावर 1200 मतांनी विजय मिळवला आहे. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला बहुमत मिळणार हे आता स्पष्ट झालंय.
पश्चिम बंगाल नंदीग्राम मतदारसंघात अटीतटीची सामना, ममता बॅनर्जी 820 मतांनी आघाडीवर, भाजपच्या शुभेंदू अधिकारी यांची कडवी लढत, कोणत्याही क्षणी नंदीग्रामचा निकाल येण्याची शक्यता
काही वेळापूर्वी आठ हजार मतांनी आघाडीवर असलेल्या ममता बॅनर्जी या आता सहा हजार मतांनी पिछाडीवर गेल्या आहेत.
तृणमूल कॉंग्रेसने चांगली आघाडी घेत भाजपला मागे सोडले आहे. नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी 8000 मतांनी आघाडीवर आहे. 16 व्या फेरीनंतर ममता बॅनर्जी 6 मतांनी मागे आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं ममता दीदीचं अभिनंदन, फोन करुन ठाकरे यांनी केलं अभिनंदन
द्रमुक प्रमुख स्टॅलिन यांनी समर्थकांना आवाहन करत कोरोना काळात कोणत्याही प्रकारचा विजयी जल्लोष नको असं म्हटलं आहे.
पश्चिम बंगालच्या नंदीग्राम मतदारसंघात भाजपचे शुभेंदू अधिकारी आणि ममता बॅनर्जी यांच्यात चुरस रंगली आहे. शुभेंदू अधिकारी यांनी पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांना मागे टाकलं आहे. विशेष म्हणजे सुरुवातीपासूनच पिछाडीवर असलेल्या ममता बॅनर्जी यांनी काही वेळापूर्वी आघाडी घेतली होती.
सुरुवातीला पिछाडीवर गेलेल्या तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी जोरदार मुसंडी मारली असून भाजपच्या शुभेन्दु अधिकारी यांच्यावर 2700 मतांचा आघाडी घेतली आहे.
पश्चिम बंगालमध्ये 292 जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये तृणमूल काँग्रेसने तब्बल 208 जागांवर आघाडी घेतली असून सत्तेकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. भाजपने 80 जागांवर आघाडी घेतलीय तर काँग्रेस-डावे दोन जागांवर पुढे आहेत.
Election Results 2021 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शऱद पवार यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे. यावेळी त्यांनी लोकांच्या भल्यासाठी तसंच करोनाशी लढण्यासाठी एकत्रित काम करुया असंही म्हटलं आहे. शरद पवार यांनी ट्वीट केलं आहे.
शरद पवार म्हणाले की, "ममता बॅनर्जींच्या या विलक्षण विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन, आता कोरोना संकटावर एकत्र येऊन काम करुयात"
नंदीग्राममध्ये तृणमूल आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत सुरू असून सुरवातील पिछाडीवर असलेल्या ममता बॅनर्जींनी मुसंडी मारत 1500 मतांची आघाडी घेतली आहे.
पश्चिम बंगालमध्ये कलांमध्ये तृणमूल काँग्रेस 200 च्या पार गेली आहे. 206 जागांवर तृणमूल काँग्रेस आघाडीवर असून भाजप 83 जागांवर पुढे आहे. तर काँग्रेसला 1 जागांवर आघाडी मिळाली आहे.
पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत तृणमूल काँग्रेसला मोठं मताधिक्य, भाजपला 37.3 टक्के मतं तर तृणमूल काँग्रेसला 48.4 टक्के मतं
पश्चिम बंगालमध्ये कलांमध्ये तृणमूल काँग्रेसची मोठी आघाडी, 194 जागांवर पुढे, तर भाजपला 93 आणि काँग्रेसला 05 जागांवर आघाडी
पश्चिम बंगालमध्ये सर्व कल हाती आले आहेत. कलांमध्ये तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं दिसत आहे. परंतु नंदीग्राम मतदारसंघात दुसऱ्या फेरीअखेरीस ममता बॅनर्जी पिछाडीवर आहेत. या मतदारसंघात भाजपचे शुभेंदू अधिकारी आघाडीवर आहे.
पश्चिम बंगालमध्ये कलांमध्ये तृणमूल काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. कलानुसार तृणमूल काँग्रेस 169, भाजप 115 आणि काँग्रेस सहा जागांवर पुढे आहेत.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचीच सत्ता येईल, ममतांना हरवणं शक्य नाही. तामिळनाडू, पुद्दुचेरी वगळता कुठेही सत्ताबदल होणार नाही : संजय राऊत
कल : पश्चिम बंगाल - भाजप 109, तृणमूल काँग्रेस 127, काँग्रेस 6 जागांवर पुढे; केरळ - डावे 79, काँग्रेस 59; तामिळनाडू - द्रमुक 75, अण्णा द्रमुक 63; आसाम - भाजप 43, काँग्रेस 20; पुद्दुचेरी - भाजप 9, काँग्रेस 5
पश्चिम बंगालच्या नंदीग्राम मतदारसंघात चुरस वाढली, ममता बॅनर्जी 1500 मतांनी पिछाडीवर आहेत. तर भाजपचे शुभेंदू अधिकारी आघाडीवर आहेत.
केरळमध्ये सर्व जागांचे सुरुवातीचे कल हाती आले असून डाव्यांना स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे.
Kerala Election Results 2021 LIVE UPDATE : केरळमध्ये सर्व जागांचे कल हाती आले असून सुरुवातीच्या कलांमध्ये डाव्यांना बहुमत मिळालं आहे. त्यामुळे केरळच्या निवडणुकीत डाव्यांचं वर्चस्व पाहायला मिळू शकतं.
नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींची मुसंडी मारली असून त्या आघाडीवर गेल्या आहेत. भाजपचे शुभेन्दु अधिकारी पिछाडीवर आहेत
सुरुवातीच्या कलानुसार नंदीग्राममधूम ममता बॅनर्जी या पिछाडीवर आहेत. शुभेंदु अधिकारी आघाडीवर आहेत.
केरळमध्ये काँग्रेसची आठ जागांवर आघाडी; पश्चिम बंगालमध्ये भाजप 6, तृणमूल काँग्रेस 11 जागांवर पुढे; आसाममध्ये भाजप 3, काँग्रेस 2 जागांवर पुढे
पश्चिम बंगालचा पहिला कल हाती, भाजप 3 आणि तृणमूल काँग्रेस 4 जागांवर पुढे
देशभराचं लक्ष लागून राहिलेल्या चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात झालेल्या निवडणुकांच्या मतमोजणीचा दिवस अखेर उजाडला असून, आता मतदारांनी नेमका कोणाला कौल दिला आहे हे काही क्षणांनी स्पष्ट होण्यास सुरुवात होणार आहे
पार्श्वभूमी
Election Results 2021 LIVE: देशातील चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात झालेल्या निवडणुकांच्या मतमोजणीला अवघ्या काही क्षणांत सुरुवात होणार असून, देशाच्या राजकीय पटलावर यामुळं मोठ्या घडामोडी घडणार असल्याची अपेक्षा अनेक राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता आसाम, केरळ, पुदुच्चेरी, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये मतदार राजानं नेमका कोणाला कौल दिला आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मतमोजणीच्याच पार्श्वभूमीवर निव़डणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार या प्रक्रियेसाठी 822 आरओ आणि 7000 एआरओंची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, 2364 केंद्रांवर मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. सध्या सुरु असणाऱ्या कोरोना संसर्गाची लाट पाहता कोणीही व्यक्ती, एजंट यांना मतमोजणी केंद्रावर आरटीपीसीआर चाचणी किंवा कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्याच्या निश्चिततेशिवाय आत घेतलं जाणार नाही.
दरम्यान, देशावर कोरोनाचं संकट ओढावलेलं असतानाच पार पडलेल्या या निवडणुकांसाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून कैक बड्या नेत्यांनी प्रचारसभा घेत मतदारांना अनेक आश्वासनं देऊ केली होती. काही भागांमध्ये या प्रक्रियेतही गालबोट लागण्याच्या घटना घडल्या. सरतेशेवटी संकटाला दूर लोटत करण्यात आलेल्या या प्रचाराचा मतदारांवर नेमका काय आणि किती परिणाम झाला आहे हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -