Vishal Patil on Sangli Vidhan Sabha : सांगली पॅटर्न सांगलीत घडू नये यासाठी आम्ही एक आहोत आणि एक राहणार आहे, आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील हे एक व्यक्ती असल्यासारखे घट्ट असल्याची प्रतिक्रिया खासदार विशाल पाटील यांनी दिली आहे. ज्या लोकसभेल विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांची राम लखनप्रमाणे जोडी दिसून आली तेच विधानसभेला सांगलीच्या जागेवरून एकमेकांविरोधात असल्याचे दिसून आलं आहे. आमदार विश्वजीत कदम सांगली विधानसभेतील काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या पाठीशी आहेत. खासदार विशाल पाटील अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांच्या पाठीशी आहेत. 



विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील हे एक व्यक्ती असल्यासारखे घट्ट 


विशाल पाटील म्हणाले की, सांगली विधानसभेमधील प्रश्न हा काँग्रेस अंतर्गत प्रश्न आहे. सांगली विधानसभेला काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर तो करून घेऊ नये. कारण सांगलीत भाजपचा पराभव होणार निश्चित आहे आणि तो पराभव आम्ही करुन दाखवू, असा विश्वास खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केला आहे. 


जयश्री मदन पाटील सरळमार्गी, भोळ्या आहेत


दरम्यान, जयश्री मदन पाटील सरळमार्गी, भोळ्या आहेत. त्यांना बंडखोरी करण्यासाठी फितवलं गेलं. कुणी फितवलं याचं सत्य बाहेर येईल तेव्हा त्याची खैर नाही हे लक्षात ठेवावं, असा इशारा देत आमदार विश्वजीत कदम यांनी दिला आहे.  जिल्ह्यात काँग्रेस पुन्हा उभी करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. लोकसभेला गोंधळ झाला, पुन्हा विधानसभेला तेच. माझ्याकडं जादूची कांडी आहे का एका विधानसभेतून दोन उमेदवार द्यायला? माझं आत एक, बाहेर एक असं नसतं. जे आहे ते क्लिअर आहे. लोकसभा एकाला, विधान परिषद एकाला, विधानसभा एकाला सगळं ठरलं होतं, असे विश्वजित कदम म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या