Wardha Lok Sabha Result 2024 Live : वर्धा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अमरावती आणि वर्धा (Wardha) जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी आमदार अमर काळे (Amar Kale), भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) अशी सरळ लढत या मतदारसंघात राहिली आहे. या लढतीत मिळालेल्या निकालानुसार, राष्ट्रवादी कॉंग्रेस गटाचे उमेदवार यांचा विजय झाला आहे. 

महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ध्यात काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. पण, गेल्या दहा वर्षात भाजपने येथे चांगलीच मुसंडी मारली आहे. दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले रामदास तडस तिसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर हॅट्रिक करणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण, या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उबाटा गटाच्या शिवसेनेने मूठ बांधली आणि प्रचारात आघाडी घेतली. काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना राष्ट्रवादीच्या तुतारीवर उमेदवारी मिळाली.

जनतेला 4 तारखेच्या निकालाची प्रतीक्षा होती. त्यानुसार, आज लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निकालात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अमर काळे यांचा विजय झाला आहे. या निवडणुकीत अमर काळे विरुद्ध रामदास तडस अशी लढत पाहायला मिळाली. 

वर्धा लोकसभेचा निकाल 2024 (Wardha Lok Sabha Election Result 2024)

उमेदवाराचे नाव  पक्ष    विजयी उमेदवार 
अमर काळे   राष्ट्रवादी कॉंग्रेस विजयी 
रामदास तडस   भाजप  
     

लोकसभा निवडणूक 2024 चा आज निकाल घोषित झाला आहे. या निकालात महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांचा 4,09,961 मते मिळवून विजय झाला आहे. तर, महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांना 3,56,250 मते मिळून पराभव झाला आहे. या निवडणुकीच्या निकालात अमर काळे यांना 53,711 मतांची आघाडी पाहायला मिळाली. 

वर्धा लोकसभा मतदार संघ मतदान अंतिम आकडेवारी

एकूण मतदार - 1682771पुरुष - 858439महिला - 824318

झालेले मतदान असे :

झालेले एकूण मतदान - 1091349मतदान झालेले पुरुष - 586780मतदान झालेले महिला - 504560एकुण मतदान टक्केवारी - 64.85इतर - 9

वर्धा लोकसभा मतदार संघ उमेदवार

रामदास तडस - भाजपअमर काळे - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटराजेंद्र साळुंखे - वंचित बहुजन आघाडी

वर्ध्यात मतदानाचा टक्का तुलनेत वाढला

वर्ध्यात मतदानाचा टक्का वाढल्याचं चित्र आहे. मागील 2019 च्या तुलनेत साडेतीन टक्क्याने मतदानाचा टक्का वाढला आहे. 2014 च्या लोकसभेच्या टक्केवारीकडे नजर टाकली तर ती 64 टक्के इतकी होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 61.18 टक्के मतदान झाले होते. यावेळी लोकसभा निवडणुकीत 64.85 टक्के इतके मतदान झाले आहे.

वर्धा लोकसभा मतदार संघ मतदान अंतिम आकडेवारी

एकूण मतदार - 1682771पुरुष - 858439महिला - 824318

झालेले मतदान असे :

झालेले एकूण मतदान - 1091349मतदान झालेले पुरुष - 586780मतदान झालेले महिला - 504560एकुण मतदान टक्केवारी - 64.85इतर - 9

वर्धा लोकसभेत  विधानसभानिहाय झालेली मतांची टक्केवारी

धामणगाव विधानसभा क्षेत्र - 61.71 टक्केमोर्शी विधानसभा क्षेत्र  - 65.01वर्धा विधानसभा क्षेत्र - 62.53आर्वी विधानसभा क्षेत्र - 68.98देवळीं विधानसभा क्षेत्र - 65.61हिंगणघाट विधानसभा क्षेत्र - 65.91

कोणत्या विधानसभा क्षेत्रात कोण आमदार

हिंगणघाट - समीर कुणावार, भाजपदेवळी  - रणजित कांबळे, काँग्रेसआर्वी - दादाराव केचे, भाजपवर्धा - पंकज भोयर, भाजपधामणगाव - प्रताप अडसड, भाजपवरुड - देवेंद्र भुयार, अपक्ष

2019 मध्ये कुणाला किती मतदान?

रामदास तडस, भाजप चारुलता टोकस, काँग्रेस 

अमर काळे यांच्या ऐनवेळी झालेल्या एंट्रीने रंग वाढला

महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण याची मोठी चर्चा माध्यमांसह कट्ट्यावर देखील वाढली. अनेक नेत्यांची नावे चर्चेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ही जागा सुटली. काँग्रेसच्या अमर काळे यांना तुतारीवर उमेदवारी दिली गेली. भाजपच्या रामदास तडस यांच्यासाठी एकतर्फी होणारा सामना अमर काळे यांच्या एंट्रीने रंगतदार झाला. 

चुरशीच्या प्रचारात राजकारणही तापले

भाजप तसेच राष्ट्रवादीकडून सभाचा धडाका लावण्यात आला. राष्ट्रवादीकडून शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय सिंग, सुषमा अंधारे यांच्या सभा झाल्या. भाजपकडून नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ, अजित पवार, नितीन गडकरी यांच्या सभा झाल्या. सभांनी राजकारण तापले, आरोप प्रत्यारोप झाले. भाजपमध्ये माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी बंडाची भाषा केली. तर तडस यांचे घरगुती वाद देखील समोर आले. अमर काळे आणि रामदास तडस यांच्यात चुरस असताना विजय कुणाचा याचा निकाल 4 जूनला आहे. गावात काळे चालले तर व्यापाऱ्यांमध्ये तडस चालले. अमक्या विधानसभा क्षेत्रात तडस यांची हवा तर पलीकडे काळे यांचेच वारे अशा चर्चा रंगते आहे. पण काट्याची टक्कर असताना निवडून येणाऱ्या उमेदवाराला मताधिक्य कमी असेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.