Rohit Pawar on Vinod Tawde : विरारमध्ये (Virar) भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी पैसे वाटल्याच्या आरोप बहुजन विकास आघाडीनं केला आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरारमध्ये तावडेंच्या स्वाक्षरीने भाजपच्या परतीचा करार पक्का झाल्याचे रोहित पवार म्हणालेत. विरारची ही टीप सागर वरुन तर देण्यात आली नाही ना? असा सवाल करत रोहित पवारांनी नाव न घेता देवेंद्र फडणीसांना (Devendra Fadnavis) टोला लगावला. माझ्या मतदारसंघातही वेगळी परिस्थिती नाही असे म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली. 


विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप


विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याच्या आरोपाचं प्रकरण सुरु होते. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही आरोप केला होता. विनोद तावडे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलला शेकडो कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता. त्यामुळे बराच काळ गदारोळ झाला. त्यानंतर पोलिसांनी विनोद तावडे यांना सुरक्षित बाहेर काढले आहे. हॉटेलमध्ये 9 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. याप्रकरणावरुन विरोधकांकडून विनोद तावडे आणि भाजपवर जोरदार टीका होताना दिसत आहे. रोहित पवारांनी देखील ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखीवल ट्वीट करत भादपवर टीका केलीय.


महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न, जयंत पाटलांची टीका


भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना वसई विरार येथे पैसे वाटताना रंगे हात पकडले गेले आहे. राज्यात जागोजागी हेच चित्र असल्याची टीका  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे . महायुतीचे प्रमुख नेते पैशांच्या बॅगा घेऊन प्रत्येक मतदारसंघात महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे जयंत पाटील म्हणाले. मात्र, महाराष्ट्रातील जनता विकली जाणार नाही. ही जनता शिव, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांची जनता असल्याचे जयंत पाटील म्हणाले. 


विधासभा निवडणुकीसाठी उद्या राज्यभर मतदान प्रक्रिया पुार पडणार आहे. अशातच पालघरमधून ही मोठी बातमी समोर आली आहे. विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणावरुन विनोद तावडे आणि भारतीय जनता पार्टीवर मोठ्या प्रमाणात टीका होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Vinod Tawde: विनोद तावडे 5 कोटी घेऊन आले, दोन डायऱ्याही सापडल्याचा आरोप; विरारमध्ये बविआ-भाजपचा राडा